Uncategorized

कवी केशवसुत पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न

कवी केशवसुत पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न 

तारापूर (प्रतिनिधी)कोकण मराठी साहित्य परिषद बोईसर तारापूर शाखा आयोजित कवी केशवसुत पुण्यस्मरण कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा तणाशी, ता. डहाणू येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शशिकांत राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठी भाषा, कविता, अभ्यास, कौशल्य विकसन व अनेक उपक्रमामध्ये सहभागी  होण्या विषयी उद्बोधक विचार मांडले तसेच शाळेतील सकारात्मक वातावरण आणि उर्जात्मक शिक्षक विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थी भाग्यवान आहेत की या आदर्श शाळेत शिकत आहेत. सर्व सोयी उपलब्ध असून, अतिशय मेहनत घेणारे उत्कृष्ट शिक्षक, बोलक्या भिंती लाभल्या आहेत;  विद्यार्थ्यांचे  भवितव्य उज्वल असून शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शाळेतील विद्यार्थिनी धनस्वी पाटील व शुभांगी कोरे यांनी कवी केशवसुतांच्या कविता सादर केल्या. कोमसापचे अध्यक्ष प्रा. संजय घरत यांनी मुलांना ‘ गुणांचा गौरव ‘  ही गोष्ट सांगून कष्ट आणि प्रामाणिकपणा यामुळेच आपण यशस्वी होऊ शकतो हा मंत्र दिला. जिल्हा प्रतिनिधी सुहास राऊत यांनी काव्यातून मार्गदर्शन केले. संदीप घरत यांनी शुभेच्छा दिल्या, तर सौ. अंजना सावे यांनी सुद्धा एका गोष्टीतून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले . शाळेतील शिक्षिका सौ. प्रतीक्षा राऊत यांनी एक तुतारी द्या मज आणूनी या केशवसुतांच्या काव्याची महती पटवून दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदीप म्हात्रे यांनी अशा प्रकारचा आगळा वेगळा साहित्यिक कार्यक्रम होत आहे याचा आनंद व्यक्त करून कवी वसंत बापटांची एक कविता विद्यार्थ्यांसोबत गाऊन घेतली. उत्कृष्ट फलक लेखन करणारे श्री. सुमित राऊत व कार्यक्रमाचे फोटोग्राफी व व्हिडिओ करणाऱ्या सौ. चैतन्या राऊत उपस्थित होत्या. प्रास्ताविक सदर करताना कार्यवाह डाॅ. स्मिता माळवदे यांनी कवी केशवसुत  विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करणाऱ्या शिक्षिका सौ. शुभांगी कोरे तर आभार शिक्षिका सौ. मानवी सावे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button