Uncategorized

भिवंडी( निंबवली)गावचा सुपुत्र(पीएचडी) यांने पूर्ण केली.

भिवंडी( निंबवली)गावचा सुपुत्र(पीएचडी) यांने पूर्ण केली.

मुंबई प्रतीनिधी: (सतिश पाटील)
डाॅ. नितीन रामदास गुळवी
(पीएचडी) डॉक्टर ऑफ फिलाॅसाॅफी ही उच्च स्तरीय ,संशोधन आधारीत पदवीधर झाले आहेत आणि त्यांनी अनेक विषयांमध्ये सर्वोच्च शैक्षणिक पात्रता मिळवली आहे.आज ते मुंबईतील मीठीबाई कॉलेजात एक आर्दश शिक्षक (प्रोफेसर)म्हणून विद्यार्थांना शिकवत आहेत. डॉ. नितीन गुळवी हे भिवंडीतील (निंबवली) गावचे शेतकरी सुपुत्र आहेत.जरी आज आपण विकसीत राज्यात असलो तरी तालुक्यात आज ही फारशी सुधारणा झाली नाही. शिक्षण व सुखसोई बाबत बर्याच प्रमाणात आज शिक्षण घेण्यासाठी शहरात व जिल्ह्य़ात जावे लागते एकतर पुर्ण दिवस वाहतुकीत जाता वा होस्टेलला राहून शिक्षण पुर्ण करावे लागते. तरी त्यांनी m .sc= विल्सन काॅलेज,मुंबई आणि ph.d. = युनिवर्सिटी ऑफ मुंबई व संशोधनाचा विषय: computational chemistry, number of international research paper=7 असे पुर्ण केले.आज ते असिस्टंट प्रोफेसर (svkm’s mithibai college) विर्ले पार्ले मुंबई येथे कार्यरत आहेत. गावात वीज त्याशिवाय अधुणीक उपकरणे,लॅपटॉप, मोबाईल अपुरीच असतात बर्याच वेळा ऑनलाईनच अभ्यासक्रम करावा लागतो अशा अनेक संकटांवर मात करीत डाॅक्टर ऑफ फिलाॅसाॅफी करणे म्हणजेच वाळवंटात पाणी शोधणे होय ! आज सर्व समाजात व जिल्ह्य़ात डाॅ.नितीन गुळवी यांच्या यशाचे कौतुक होत आहे. गावाचे, आगरी समाजाचे नाव आणखी मोठे करावे हीच त्यांना शुभेच्छा ! अभिनंदन पुढील वाटचालीस.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button