Uncategorized

विवळवेडे येथे श्री महालक्ष्मी माता यात्रा उत्सवाचे आयोजन

विवळवेडे येथे श्री महालक्ष्मी माता यात्रा उत्सवाचे आयोजन


दहाणू, (प्रतिनिधी) :
श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, विवळवेडे (ता. दहाणू, जि. पालघर) यांच्या वतीने श्री महालक्ष्मी माता यात्रा कार्यक्रम रूपरेषा – २०२६ जाहीर करण्यात आली आहे. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा व विशेष विधींचे आयोजन करण्यात आले असून भाविकांसाठी मंदिर दर्शनाची वेळही निश्चित करण्यात आली आहे.
कार्यक्रमानुसार १ एप्रिल रोजी ‘फुलांग’ चढविणे व अंतर्गत पूजेसाठी मंदिर सकाळी ११ ते सायं. ४ वाजेपर्यंत बंद राहील, तर सायंकाळी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. २ एप्रिल रोजी ‘वाघबारस’ निमित्त पहिला हवन होईल, तसेच रात्री १२ वाजता पुजारी गडावर ढोल-ताशांच्या गजरात जाणार असून मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुले राहील.
३ ते ६ एप्रिल दरम्यान मंदिर सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. ७ एप्रिल रोजी ‘फुलांग’ उतरविणे व अंतर्गत पूजेकरिता मंदिर दुपारी १२ ते सायं. ४ पर्यंत बंद राहील, त्यानंतर भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
८ व ९ एप्रिल रोजीही मंदिर नियमित वेळेनुसार खुले राहील.
तसेच १० एप्रिल रोजी चैत्र अष्टमीच्या हवनाला सायंकाळी ६ वाजता प्रारंभ होऊन रात्री ११.४५ वाजता पूर्णाहुती होणार आहे. या दिवशी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे.
यानंतर ११ ते १६ एप्रिल दरम्यान मंदिर सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत खुले राहील, तर १७ एप्रिल रोजी अंतर्गत पूजेसाठी दुपारी १२ ते सायं. ४ पर्यंत मंदिर बंद राहणार असून त्यानंतर रात्री ९ पर्यंत दर्शनासाठी खुले राहील.
यात्रा काळात मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा असून ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांनी शिस्त राखून दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button