Uncategorized

भांडुप स्टेशन पश्चिम कपड्याच्या दुकानाला भीषण आग

भांडुप स्टेशन पश्चिम कपड्याच्या दुकानाला भीषण आग!

मुंबई प्रतिनिधी :(सतिश पाटील)
भांडूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत,’एस’ विभाग कपड्याच्या पाच व एक ज्युस सेंटर अशा सहा दुकानांना भीषण आग लागली.
ठिकाण :
भांडुप रेल्वे स्टेशन पश्चिम ड्रीम मॉल शेजारी दुकान लाईन आहे.
तरीकोणतीही जीवीत हानी झाली नाही असा अंदाज आहे पण दुकाने जवळ जवळ बेचिराग झाली घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल व भांडुप पोलीस हजर झाले आणि आग आटोक्यात आणण्याचा शर्थीने प्रयत्न चालू केले. आग का लागली याचा प्राथमिक तपास भांडुप पोलीस ठाणे अधिकारी, अग्निशमन दल व महाराष्ट्र वीज मंडळ करीत आहेत अशी माहिती मिळते. आग लावल्यावर सर्व दुकानदार आपले जीव व सामान हलवण्यात व्यस्त होते.कदाचित इलेट्रीक शॉर्टसर्किट लागली असावी असा अंदाज आहे.बर्याच माध्यमातून मोबाईल दुकानात आग लागली अशी बातमी व विडिओ व्हायरल होत आहे तरीही घटना स्थळी कपडे विक्रीची दुकाने आहेत. आग भडकण्याचे कारण दुकानाच्या छतावर पुठ्ठे व प्लास्टिक, यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button