बुलेट ट्रेन विकास का भकास?
मनमानी कारभार विरोधात अंदोलन

बुलेट ट्रेन विकास का भकास?
मनमानी कारभार विरोधात अंदोलन
मुंबई प्रतीनीधी: (सतिश पाटील)
भरोडी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या बुलेट ट्रेन कामबंद आंदोलन व बेमुदत साखळी उपोषणात आज सहभागी झालो.
भरोडी गाव–विद्यामंदिर अंजूर या मार्गाचा अभाव शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी अडचण बनला आहे. मुलांना सुरक्षितपणे शिक्षणासाठी ये-जा करता यावी, ही अत्यावश्यक मागणी तातडीने सोडवली जाणे आवश्यक आहे. तसेच भरोडी गावातील शेतकऱ्यांना अंजूर आणि आलिमघर गावालगत असणाऱ्या त्यांच्या शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्यांचा दैनंदिन शेती व्यवसाय अडथळ्यात आला आहे. या दोन्ही मागण्या ग्रामस्थांच्या हक्काच्या व न्याय्य आहेत. ग्रामस्थांच्या लढ्यात मी सदैव त्यांच्या सोबत उभा आहे. विकास नक्कीच झाला पाहीजे पण विकासाच्या आड शाळांवर, शेतकऱ्यांवर आणि स्थानिक ग्रामस्थांवर जर अन्याय होत असेल तर तो विकास नक्कीच भकास होणार आहे याचा भिवंडीतील व शाळा, ग्रामस्थांकडून विरोध दर्शविला आहे अणि बुलेट ट्रेन प्रकल्पात विरोधात अंदोलनास बसले आहेत जोपर्यंत योग्य पर्याय रहदारीचा रस्ता देत नाहीत लेखी आश्वासन तोपर्यंत माघार घेणार नाही असाण ठाम निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे .