ठाणे येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, वर्धापनदिन कार्यक्रमात डॉ. निलेश राऊत यांना विशेष सन्मान पुरस्काराने सन्मानित


ठाणे येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, वर्धापनदिन कार्यक्रमात डॉ. निलेश राऊत यांना विशेष सन्मान पुरस्काराने सन्मानित
१८ नोव्हेंबर
पालघर ( एच लोखंंडे ) शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या ८व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने १७ नोव्हेंबर २०२५ रोजी, ठाणे येथील आयोजित कार्यक्रमाला लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते मा. एकनाथजी शिंदे साहेब, मा. श्री. नरेश म्हस्के खासदार ठाणे लोकसभा, यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी पालघर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पालघर जिल्हा प्रमुख ॲड.डॉ.निलेश रमेश राऊत यांच्या सामाजिक व रुग्णसेवेची कार्याची दखल घेत, वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्या माध्यमातून त्यांना मानद डॉक्टर पदवी देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्याबद्दल ठाणे येथील आयोजित रुग्णसेवकांचा वैद्यकीय सेवा ” सन्मान सोहळा” कार्यक्रमात श्री.निलेश रमेश राऊत रा.पालघर ता.जि.पालघर ( मुळ गाव – दातिवरे ) यांचा ठाणे महानगर पालिकेच्या माजी महापौर आणि लाडकी सुन अभियानाच्या प्रमुख, उपनेत्या सौ. मिनाक्षीताई शिंदे यांच्या हस्ते मान्यवरांचा उपस्थित सन्मानचिन्ह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे कृतज्ञता पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे ओएसडी श्री.मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री. राम राऊत यांच्या सह अनेक ज्येष्ठ नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवर यांच्या उपस्थितीत गरीब गरजू रुग्णासाठी मोफत जयपूर फूट, व्हीलचेअर आणि इतर साहित्यांचे देखील वाटप करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक भरातील रुग्णसेवक उपस्थित होते.अनेक पदाधिकाऱ्यांना सुध्दा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला पालघर जिल्ह्यातील वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी श्री.प्रथमेश बांदेकर – वसई तालुका प्रमुख, श्री.दिपेश घरत -पालघर ता. उप प्रमुख,श्री. प्रसाद कुडू -सफाळे विभाग प्रमुख, श्री. सुहास रावते – विक्रमगड ता. सह समन्वयक उपस्थित होते.