Uncategorized

विनायकराव पाटील महाविद्यालयात हर घर संविधान उपक्रम

विनायकराव पाटील महाविद्यालयात हर घर संविधान उपक्रम


तलासरी दि. १९(डॉ. दत्तात्रय शिंदे)

भारताच्या संविधानाच्या पंचाहत्तर वर्षपूर्तीनिमित्त विनायकराव बीपाटील उच्च माध्यमिक कला व वाणिज्य महाविद्यालय हळदपाडा येथे “हर घर संविधान” आणि “संविधान ओळख” या उपक्रमांच्या माध्यमातून विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ‘अनुलोम’ संस्थेच्या प्रतिनिधी श्रीम. अश्विनी तामोरे मॅडम यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहत विद्यार्थ्यांना संविधानाची तत्त्वे, मूल्ये आणि नागरिक म्हणून असलेली जबाबदारी याबाबत सखोल आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. तुवर सर यांनी करून संविधानाच्या गौरवशाली इतिहासाची व आजच्या तरुण पिढीने त्याचे जतन करण्याची गरज अधोरेखित केली.
स्वागत प्रा. विद्या खामकर यांनी केले तर कार्यक्रमाला आवश्यक तांत्रिक सहकार्य प्रा. महेश गुहे यांनी दिले.
कार्यक्रमाची सांगता प्रा. आनंद बुंधे यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानून केली.
या उपक्रमात इयत्ता ११वी व १२वी कला व वाणिज्य शाखेतील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी संविधानाबाबत अधिक जाणून घेण्याची व त्यातील आदर्श प्रत्यक्ष जीवनात पाळण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
या आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता, अभिमान व उत्तरदायित्वाची भावना दृढ झाल्याचे प्रतिपादन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button