Uncategorized

अंभई जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!

अंभई जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!


अंभई, पालघर (किशोर पाटील)
समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष
डॉ.श्री.सोन्या काशीनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण न्यासच्या पालघर
जिल्हा अध्यक्षा सौ. अंजली स. चौधरी यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळा, अंभई येथे विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
या कार्यक्रमात धर्म सेवक डॉ.श्री. सोन्या काशीनाथ पाटील यांच्या समाजहितकारी कार्याचा व त्यांच्या समाज कल्याण न्यासच्या विविध उपक्रमांचा परिचय करून देण्यात आला. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे प्रभावी परिवर्तनाचे साधन ठरावे, या उद्देशाने संस्थेमार्फत विविध योजनांची अंमलबजावणी होत असल्याचेही उपस्थितांना सांगण्यात आले.
सौ. अंजली स. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक नियोजन, अभ्यास पद्धती, आत्मविकास आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सवयी याबाबत मार्गदर्शन केले. “योग्य नियोजन, सातत्य आणि शिस्त यांचा आधार घेतल्यास कोणतेही लक्ष्य गाठता येते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, पालक तसेच समाज कल्याण न्यासचे कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही आपली भावना व्यक्त करत संस्थेचे आभार मानले.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाला प्राधान्य देत अशाप्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यास समाज कल्याण न्यास कटिबद्ध असल्याचे सौ. अंजली चौधरी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button