Uncategorized

पालघर नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात वकील राहुल ठाकरे यांची दमदार एन्ट्री!

पालघर नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात वकील राहुल ठाकरे यांची दमदार एन्ट्री!

पालघर (प्रतिनिधी): पालघर नगर परिषद निवडणुकीत नवा राजकीय भूचाल घडवत प्रसिद्ध वकील राहुल ठाकरे यांनी अपक्ष म्हणून पालघर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताच राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. पारंपरिक राजकीय पक्षांच्या गणिताला छेद देत, स्वतःच्या ताकदीवर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे हे निवडणुकीतील सर्वात चर्चेतील उमेदवार ठरत आहेत.

कायद्याचे विलक्षण ज्ञान, तरुणाईत भक्कम पकड, नागरिकांच्या प्रश्नांवर थेट लढणारा आवाज आणि भ्रष्टाचाराविरोधातील ठाम भूमिका… या सगळ्यामुळेच त्यांच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.

“नगराध्यक्षपद हे सत्तेचे नव्हे, जबाबदारीचे स्थान आहे. पालघरच्या सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मी अपक्ष म्हणून उभा राहिलो आहे,” असे ठाकरे यांनी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

स्थानिक समस्यांवर असलेली त्यांची पकड आणि कायदेशीर अनुभवामुळे अनेक मतदारांमध्ये त्यांची प्रतिमा ‘दृढनिश्चयी वकिलापासून थेट नगराध्यक्ष’ अशी निर्माण होत आहे. कोणत्याही पक्षाच्या कुचंबणीत न अडकता, स्वच्छ, पारदर्शक आणि धडाकेबाज प्रशासन देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

राहुल ठाकरे यांच्या एन्ट्रीमुळे या निवडणुकीचा त्रिकोणी की चौकोनी मुकाबला होणार?
पक्षीय उमेदवारांची समीकरणे बदलणार की नव्या नेतृत्वाला मतदार संधी देणार?
या सर्व प्रश्नांची उत्तरे मतदान पेटीतूनच मिळणार आहेत.

पालघरच्या राजकारणात वकील राहुल ठाकरे यांच्या या धडाकेबाज प्रवेशाने निवडणूक अधिकच रंगतदार झाली असून सगळ्यांच्या नजरा आता त्यांच्या प्रचार रणनितीकडे लागल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button