डहाणूत भाजपचा मोठा राजकीय धमाका!नगराध्यक्ष पदाच्या दावेदारी साठी भरत राजपूत सज्ज.

डहाणूत भाजपचा मोठा राजकीय धमाका!नगराध्यक्ष पदाच्या दावेदारी साठी भरत राजपूत सज्ज.
डहाणू (प्रतिनिधी)
डहाणू नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर पालघर जिल्ह्यात आज सर्वांचे लक्ष वेधून घेणारी मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. भरत राजपूत, भाजपचे पालघर जिल्हा प्रमुख, यांनी अखेर डहाणू नगर परिषदेसाठी भाजपच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली असून यामुळे संपूर्ण परिसरात राजकीय तापमान एकदम चढले आहे.
जिल्हा प्रमुख भरत राजपूत यांनी अत्यंत दमदार शब्दांत घोषित केले की—
“डहाणूच्या विकासाला आता वेग देण्याची वेळ आली आहे. पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि जनता-केंद्रित काम करणारी मजबूत टीम भाजपकडे आहे. आता डहाणूत खऱ्या अर्थाने विकासाचा डंका वाजणार!”
भाजपच्या उमेदवार घोषणेनंतर डहाणू तालुक्यातील राजकीय समीकरणे जलदगतीने बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
नगर परिषदेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजपने मैदानात उतरवलेले उमेदवार अनुभवी, कार्यकर्तेप्रिय आणि विकासनिष्ठ असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक पातळीवर भाजपच्या या घोषणेचे प्रचंड स्वागत होत असून सर्वच वॉर्डमध्ये पक्षकार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा जोश पाहायला मिळत आहे.
भाजपकडून उमेदवार जाहीर होताच विरोधकांमध्ये खळबळ उडाली असून आगामी निवडणूक अधिकच रोचक होण्याची चिन्हे आहेत.
डहाणू नगर परिषद निवडणुकीतील सर्वात मोठा ‘गेम चेंजर’ ठरणारी ही घोषणा – भरत राजपूत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा विजयाचा बिगुल! वाजणारच ?