Uncategorized

पालघर नगरपरिषद निवडणूक 2025 पालघरच्या राजकारणात मोठा उलथापालथ करणारी धडाकेबाज एन्ट्री!

पालघर नगरपरिषद निवडणूक 2025 पालघरच्या राजकारणात मोठा उलथापालथ करणारी धडाकेबाज एन्ट्री!

पालघर (प्रतिनिधी)
माजी नगराध्यक्ष सौ. प्रियंका प्रवीण पाटील यांनी अखेर शिवसेना शिंदे गटातून नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

शहर विकासात नाव कमावलेली आणि लोकाभिमुख कामासाठी ओळख असलेली प्रियंका पाटील यांची उमेदवारी घोषित होताच राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या मजबूत कार्यकर्ता बळावर आणि पूर्वीच्या नगराध्यक्ष पदावरील कारकिर्दीमुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार यात शंका नाही.

स्थानिक पातळीवर महिलांचे नेतृत्व, विकासकामांना मिळणारा वेग आणि शिंदे गटाला मिळणारा बळकटीकरण हा या उमेदवारीचा मोठा फायदा मानला जातो.

➡ “प्रियंका पाटील रिंगणात उतरल्याने समीकरणे बदलणारच!”
असा सूर राजकीय जाणकारांमध्ये ऐकायला मिळत आहे.

ही उमेदवारी पालघरच्या निवडणुकीत एक गेम-चेंजर ठरणार, अशी जोरदार चर्चा सध्या शहरात रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button