पालघर नगर परिषद निवडणूक 2025 पालघरमध्ये प्रितम राऊत यांच्या प्रचाराला ‘उद्यान’ — काँग्रेसला मिळतंय अभूतपूर्व जनसमर्थन!

पालघर नगर परिषद निवडणूक 2025 पालघरमध्ये प्रितम राऊत यांच्या प्रचाराला ‘उद्यान’ — काँग्रेसला मिळतंय अभूतपूर्व जनसमर्थन!
पालघर (प्रतिनिधी)
पालघर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रितम राऊत यांच्या प्रचाराने अक्षरशः जोरदार उधाण आलं आहे. गेल्या अनेक निवडणुकीत फारशी चमक न दाखवणारी काँग्रेस, यंदा मात्र पूर्णपणे वेगळ्या जोशात दिसत आहे.
शहरातील प्रभागांमध्ये घेतलेल्या सभा, पदयात्रा आणि घरदार संपर्कात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता काँग्रेस उमेदवार नगराध्यक्ष पदावर विजयी होण्याची शक्यता प्रबळ असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
राऊत यांच्या प्रचारादरम्यान युवक, महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वत्र वाढता विश्वास दिसत असून, स्थानिक प्रश्नांना दिली जाणारी प्राधान्यक्रमाची हमी, स्वच्छ–सुंदर पालघरचा संकल्प, आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची भूमिका यामुळे त्यांच्याभोवती समर्थनाची लाट निर्माण झाली आहे.
राजकीय पातळीवर पहिल्यांदाच असे वातावरण निर्माण झाले आहे की, काँग्रेस पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष पदावर भक्कम आघाडी घेऊ शकतो, अशी चर्चा पालघरमध्ये सर्वदूर रंगत आहे.
आगामी काही दिवसांत प्रचार आणखी गती घेणार असून, पालघरच्या राजकारणात प्रितम राऊत यांचे नाव ‘किंगमेकर’ नव्हे तर ‘किंग’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत.