Uncategorized

कॉ. गोदावरी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागामार्फत कंपनी सेक्रेटरी (CS) कोर्सविषयी मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन

कॉ. गोदावरी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागामार्फत कंपनी सेक्रेटरी (CS) कोर्सविषयी मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन

तलासरी (प्रतिनिधी)आदिवासी प्रगती मंडळ संचलित, कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, तलासरी येथील वाणिज्य विभागात ‘कंपनी सेक्रेटरी (CS) कोर्स व वाणिज्य क्षेत्रातील करिअर संधी’ या विषयावर विशेष मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हे व्याख्यान दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 12.:30 वाजेपर्यंत घेण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) येथील श्रीमती विमला जोगाडिया यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना कंपनी सेक्रेटरी कोर्सची सविस्तर माहिती दिली. त्यांनी CS कोर्सची रचना, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा पद्धती, इंटर्नशिप, तसेच कंपनी लॉ, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, सिक्युरिटीज लॉ इत्यादी विषयांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. श्री. दीपक भोसले त्याचे सहकारी सबंधित कार्यक्रमास उपस्थित राहिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत, उपप्राचार्य प्रा. निलेश साळवे, तसेच वाणिज्य विभागाचे प्रा. रितेश रायचाना आणि प्रा. महेश माळवदकर उपस्थित होते. या मार्गदर्शन सत्रास 210 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्रीमती जोगाडिया यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून CS कोर्सची वैशिष्ट्ये सांगताना नमूद केले की, आजच्या जलद गतीने बदलणाऱ्या कॉर्पोरेट क्षेत्रात कंपनी सेक्रेटरीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कंपनीच्या कायदेशीर, प्रशासकीय आणि गव्हर्नन्स पद्धती योग्यरीत्या पार पडण्यासाठी CS ही महत्त्वाची भूमिका बजावते. आता 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी CS कोर्समध्ये प्रवेश घेण्याची सुविधा असून कोर्स तीन टप्प्यांत पूर्ण होतो. CSEET (Entrance Test) प्रवेश परीक्षा , कार्यकारी व्यवस्थापक , आणि व्यवसायिक कार्यक्रम यासोबतच अनिवार्य इंटर्नशिप केल्यास विद्यार्थी उद्योगजगताशी प्रत्यक्ष जोडले जातात. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअर संधींबाबत सांगताना असे नमूद केले की, कंपनी सेक्रेटरी हा केवळ कंपनीतील अधिकारी नसून, कॉर्पोरेट कायदा , सिक्युरिटीज मार्केट, मर्जर्स-अँड-अक्विझिशन, कंप्लायन्स मॅनेजमेंट, कॉर्पोरेट प्लॅनिंग यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्येही ते करिअर करू शकतात. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. प्रा. निलेश साळवे यांनी केले, तर उपस्थितांचे स्वागत प्रा. महेश माळवदकर यांनी केले. प्राचार्य डॉ. राजपूत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी अशा करिअर-आधारित उपक्रमात आवर्जून सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. रितेश रायचना यांनी केले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला व भविष्यात अशा प्रकारच्या उपयुक्त मार्गदर्शन सत्रांची अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button