पालघर – अपक्ष उमेदवार निशांत धोत्रे यांची दमदार निवडणूक तयारी

पालघर – अपक्ष उमेदवार निशांत धोत्रे यांची दमदार निवडणूक तयारी
पालघर (प्रतिनिधी)पालघर नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निशांत धोत्रे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे.
निशांत धोत्रे यांनी आपल्या वॉर्डमधील प्रत्येक घरामध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पाणी, रस्ते, गटार व्यवस्था, स्वच्छता तसेच इतर स्थानिक प्रश्नांची त्यांनी बारकाईने माहिती घेतली. नागरिकांशी थेट संवाद साधत “निवडून येताच सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले.
अपक्ष उमेदवार म्हणून कोणत्याही पक्षाच्या दबावाशिवाय लोकांसाठी काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला असून त्यांच्या दरवाजातून सुरू असलेल्या या प्रत्यक्ष जनसंपर्क मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निशांत धोत्रे यांची ही सरळ, लोकाभिमुख शैली लक्षवेधी ठरत आहे.