Uncategorized

नवीन वेळापत्रकात डहाणूकर प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण होतील का?

नवीन वेळापत्रकात डहाणूकर प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण होतील का?

पालघर:_

चर्चगेट ते डहाणू हा उपनगरीय क्षेत्र म्हणून कार्यान्वित आहे आणि त्यादृष्टीने विरार नंतर डहाणू पर्यंत लोकलच्या दिवसभरात किती फेऱ्या होणे अपेक्षित असतात हा गांभीर्याने विचार करणारा प्रश्न आहे. तथापि विरार-डहाणू चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत किमान दिवसभरात अप-डाऊन अशा ५० फेऱ्या तरी होणे आवश्यक आहेत.
मुंबई पासून अगदी शेजारी म्हणजे विरार नंतर डहाणू पर्यंत उपनगरीय क्षेत्र म्हणून १९९५ ला घोषित होऊन प्रत्यक्षात विरार नंतर डहाणू लोकल २०१३ ला सुरू झाली. सुरवातीला डहाणू लोकलच्या दिवसभरात १० अप १० डाऊन अशा फेऱ्या सुरू झाल्या आणि कालांतराने ह्या फेऱ्या वाढत जाऊन आजच्या घडीला २१ अप २१ डाऊन अशा फेऱ्या होत आहेत, तथापि मागील १० वर्षात डहाणू विभागात नागरिकरण खूप वाढले आहे, तसेच औद्योगिकरणाच्या दृष्टीने ठाणे, भिवंडी,पनवेल ते थेट घोलवड पर्यंतचे प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून डहाणू विभागात लोकल, मेमू आणि शटल गाड्यांच्या फेऱ्या वाढणे आवश्यक आहेत.
🟣 डहाणू लोकलच्या किमान ५ फेऱ्या अंदाजे खालील वेळेत अपेक्षित आहेत.
🟦 मुंबई कडे जाण्यासाठी डहाणूहून (अप)
१) पहाटे ३:५०
२) सकाळी – ७:४०
३) संध्याकाळी- ४:४५
४) संध्याकाळी- ६:१५
५) रात्री – ११:३०
🟦 डहाणू कडे जाण्यासाठी विरारहून (डाऊन)
१) सकाळी- ७:३०
२) दुपारी – २:३०
३) संध्याकाळी- ५:३०
४) रात्री- ८:००
५) रात्री- १०:१५
🟦डहाणू लोकल १५ डब्यांच्या करणे हे सुद्धा अपरिहार्य असून काही फेऱ्या येत्या काळात उपलब्ध होतील अशी सर्व प्रवाशांच्या अपेक्षा आहेत.

🟣 वैतरणा स्थानकात १९४२५-२६ – मुंबई नंदुरबार पॅसेंजर या गाडीला थांबा मिळावा.
वैतरणा रेल्वे स्थानक हे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात असुन विरार पासुन अवघ्या ७ किमी अंतरावर असून ह्या स्थानकातून रोज १८ ते २० गावातील स्थानिक नागरीक प्रवास करत असतात.ह्या स्थानकात रात्री दुसऱ्या पाळीतुन घरी येणाऱ्या नोकरदार प्रवाशांना रात्री विरार येथून १०:५० ला सुटणारी ०९०८३ विरार-डहाणू मेमू गेल्यानतंर १९४२५-२६ मुंबई नंदुरबार पॕसेजर ही गाडी आहे.परंतु ही गाडी वतैरणा स्थानकात अनेक वर्षा पासून थांबत नाही तरी ह्या १९४२५-२६ ह्या गाडीला अप-डाऊन दोन्हीही दिशेने थांबा देण्यात यावा अशी विनंती.

🟣 खालील प्रमाणे दोन गाड्यांचा विस्तार आवश्यक आहे.
1) 69154 वलसाड- उमर गाव मेमू डहाणू स्थानका पर्यंत विस्तारित करावी.
2) 22930 बरोडा-डहाणू एक्सप्रेस ही गाडी डहाणू येथे सकाळी 11:10 येऊन परती साठी डहाणू येथून दुपारी 15:45 ला सुटते, जवळपास ही गाडी डहाणू येथे साडेचार तासापेक्षा जास्त वेळ यार्ड मध्ये थाबून असते तरी ह्या गाडीला विरार पर्यंत विस्तारित केल्यास मुंबई येथील प्रवाशांना एक बरोडा स्थानका पर्यंत थेट गाडी उपलब्ध होईल. सदर गाडीस सफाळे, पालघर, बोईसर ह्या रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा जेणे करून विरार-डहाणू दरम्यानच्या अनेक प्रवाशांना फायद्याचे ठरेल.
🟣 ट्रेन क्रमांक ०९०५६ उधना वांद्रे सुपरफास्ट ट्रेन गुरुवार आणि शुक्रवारी (कामाच्या दिवशी) धावत नाही, ज्यामुळे कामगार वर्ग, विद्यार्थी, शेतकरी, कर्मचारी आणि स्थलांतरितांना (केळवे रोड, वाणगाव, डहाणू, बोर्डी रोड, घोलवड येथून वापी भिलाड आणि उंबरगावला जाणारे स्थलांतरित) प्रचंड त्रास होत आहे. म्हणून,ह्याआधी नियमित सुरू असलेली ट्रेन क्रमांक ५९०४६ बाबत काही तोडगा निघेपर्यंत, ट्रेन क्रमांक ०९०५५/०९०५६ ह्या दररोजची सेवा म्हणून सुरू करण्यात याव्यात.
🟣गाडी क्रमांक ६९१६१/६९१६४ – पनवेल डहाणू मेमू ही घोलवड/उंबरगाव/भिलाड पर्यंत वाढवण्याचा विचार करा. नवी मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या दैनंदिन प्रवाशांसाठी हे खूप फायदेशीर ठरेल. (या भागात नवी मुंबईला जाण्यासाठी आणि जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही.)
🟣 उमरोळी स्थानकात शटल,पॅसेंजर व मेमू शटल यांना थांबा मिळावा.
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते डहाणू उपनगरीय रेल्वे स्थानका दरम्यान असलेले उमरोळी हे एक SG- 3 ग्रेड रेल्वे स्थानक आहे. ह्या स्थानकाचे वार्षिक उत्पन्न अंदाजे 9-10 कोटी असे आहे. सदर स्थानक पालघर आणि बोईसर स्थानकादरम्यान येते.सदर उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या दृष्टीने ह्या स्थानकावर सर्व शटल,मेमू थांबणे आवश्यक आहे ,परंतु खालील दर्शविलेल्या गाड्या उमरोळी स्थानकात थांबत नाहीत तरी ह्या सर्व गाड्यांना उमरोळी स्थानकात थांबा देण्यात यावा अशी विनंती आहे.
🟣 पालघर-ठाणे जिल्हा रेल्वेने जोडावा.
पालघर आणि ठाणे पूर्वी एकत्रित जिल्हा होता तेव्हा सुद्धा जिल्ह्यात रेल्वे सेवा उपलब्ध नव्हती अपेक्षा आहे पालघर जिल्ह्या ठाणे जिल्ह्या जोडण्यासाठी/ जाण्यासाठी आणि भिवंडी औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या येणाऱ्या कामगार वर्गासाठी आणि सामान्य नागरिक प्रवाशांच्या सोयीसाठी डहाणू ते ठाणे, भिवंडी अशा मेमू सेवा सुरू करण्यात याव्यात ज्या वाया वसई भिवंडी मार्गे धावू शकतील.
🟣 बोर्डी स्थानकात शटल,पॅसेंजर व मेमू शटल यांना थांबा मिळावा.
तलासरी तालुक्यातील झाई-बोरीगाव ग्रामपंचायत या जवळ जवळ ५०,००० लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात १९९४ साली पश्चिम रेल्वेवर बोर्डी हे स्थानकाची स्थापना झाली.बोर्डी हे महाराष्ट्रातील पश्चिम रेल्वेवरील शेवटचे स्थानक आहे. झाई हे मच्छीमारीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे तसेच बोर्डी स्टेशनच्या २० ते २५ किलोमीटर परिघात फळबागायत व पर्यटन विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. झाई व बोरिगाव येथे बऱ्याचशा औधगिक प्रशिक्षण केंद्र, इंजिनिअरिंग महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थी वर्ग गेली कित्तेक वर्षे लांबून प्रवास करीत आहे. या सगळ्या स्थरातील प्रवासी वर्गाला रेल्वे हा अतिशय उपयुक्त दळणवळनाचे माध्यम होऊ शकते. परंतु सध्या बोर्डी स्थानकात फक्त दोन अप व दोन डाउन गाड्या थांबतात. त्यामुळे येथे येणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन तसेच नोकरदार,शेतकरी तसेच मच्छीमार वर्गाला तेवढा फायदा होत नाही. खालील प्रमाणे उल्लेख केलेल्या शटल,पॅसेंजर व मेमू शटल यांना थांबा दिल्यास या भागातील हजारो आदिवासी, विद्यार्थी व नोकरदार लोकांना ह्याचा फायदा होईल.
🔷 प्रतिक्रिया 🔷
रेल्वे प्रशासनास नेहमी सतत त्याच त्याच समस्यांची आठवण करून द्यावी लागते, पाठपुरावा करावा लागतो.प्रत्यक्षात डहाणू विभाग रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने समस्यांने फार पूर्वीपासूनच ग्रासलेल्या अवस्थेत आहे आणि ह्याला जबाबदार कोण हे अभ्यासाची बाब आहे.येणाऱ्या काळात विरार-डहाणू चौपदरीकरण पूर्ण होईल परंतु ह्या प्रकल्पाचे सुरू असलेले काम इतक्या संथ गतीने सुरू आहे की दिलेल्या मुदतीत म्हणजे २०२७ ला पूर्ण कसे होईल ह्याबाबतीत शंका असून हा प्रकल्प पूर्ण होता होता प्रवासी संख्या सुद्धा वाढत जाणार असल्याने डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविणे हाच एक मुख्य उपाय ठरणार असून त्याकडे रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.
— दयानंद पाटील
मायखोप, केळवेरोड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button