वेंगुर्लेकर कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी



वेंगुर्लेकर कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी
पालघर प्रतिनिधी : प्रणय मेहेर
पालघर शहरात रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ROTARY CHAMPION CUP – 5th Rotary Palghar Open Karate Championship या भव्य कराटे स्पर्धेत वेंगुर्लेकर कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत आपली छाप पाडली आहे.
या स्पर्धेत पालघर जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, नाशिक आदी विविध भागांतील नामांकित कराटे अकादमींच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कठोर स्पर्धेला सामोरे जात वेंगुर्लेकर कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांनी काटा व कुमिते या प्रकारांमध्ये उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत अनेक सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे प्रशिक्षकांचे शिस्तबद्ध मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि पालकांचा मिळालेला पाठिंबा महत्त्वाचा ठरला. कमी वयातच आत्मविश्वास, शिस्त आणि आत्मसंरक्षणाचे धडे घेत विद्यार्थ्यांनी केलेली ही कामगिरी कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. वेंगुर्लेकर कराटे क्लासच्या या यशामुळे पालघर शहराच्या क्रीडा क्षेत्रातील नावलौकिकात भर पडली असून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही हे विद्यार्थी चमकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.वेंगुर्लेकर कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांनची उत्कृष्ट कामगिरी
पालघर मध्ये रोटरी क्लब ऑफ पालघर ने आयोजित केलेल्या
ROTARY CHAMPION CUP
5th Rotary Palghar Open Karate Championship 2025
मध्ये क्लासच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण ३३ पदके आणि ४ ट्रॉफी पटकावली त्यात
सुवर्ण – १८, रौप्य- १० आणि कांस्य – ५.
Rotary Open Champion Cup १८ वर्षा वरील आपल्या नावावर करनारे
मुलीन मध्ये
कुमारी दिया सचिन महाजन
मुलान मध्ये
कुमार प्रशील आजय जाधव
ही उल्लेखनीय कामगिरी ज्यांच्या मुळे शक्य झाली ते क्लासचे सर सिहान प्रतीक राऊत सर, शेनसाई संदीप वेंगुर्लेकर सर आणि सिहान राजेश मोरे सर यांचा मोलाचा वाटा आहे,. यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यी कसून परीश्रम करता.
विजयी झालेल्या विद्यार्थ्यांनची नावे
१. दिया महाजन काथा कुमिते
सुवर्ण सुवर्ण
. ग्रुप काथा प्रकारात प्रथम क्रमांक – ट्रॉफी
. कुमिते ओपन च्यांमपीयनशिप मध्ये प्रथम क्रमांक – ट्रॉफी
२. प्रशिल जाधव काथा सुवर्ण
कुमिते सुवर्ण
. कुमिते ओपन च्यांमपीयनशिप मध्ये प्रथम क्रमांक – ट्रॉफी
नाव. काथा कुमिते
३ तनया गोरेगावकर रोंप्य
४ तिर्थ गोरेगावकर रोंप्य सुवर्ण
५ पर्वनी वेंगुर्लेकर. सुवर्ण
६ कलश महाला. सुवर्ण रोंप्य
७ रिद्धी मोरे. सुवर्ण सुवर्ण
८ कविश महाला. सुवर्ण
९ रुद मोरे. कास्य कास्य
१० अक्षर घरत. कास्य
११ पार्थ पाटील. सुवर्ण
१२ गंधर्व भालेराव. रोंप्य रोंप्य
१३ द्वीप मोरे. सुवर्ण कांस्य
१४ नैतिक सिंग. रोंप्य. रोंप्य
१५ दीप्ती गायके. सुवर्ण. सुवर्ण
१६ ओवी माने. सुवर्ण. सुवर्ण
१७ पूर्वा कुंभार. कांस्य
१८ श्रेयस शेळके. रोंप्य. रोंप्य
१९ याशिका मोरे. रोंप्य
२० शरयू शेळके सुवर्ण. सुवर्ण
२१ शियान निजय ट्रॉफी