मुंबई ( चिंचपोकळी ) येथील ज्येष्ठ पत्रलेखक -पत्रकार श्री. बाळ पंडित- कोकण रत्न पदवी पुरस्काराने सन्मानीत.

मुंबई ( चिंचपोकळी ) येथील ज्येष्ठ पत्रलेखक -पत्रकार श्री. बाळ पंडित- कोकण रत्न पदवी पुरस्काराने सन्मानीत.
१५ डिसेंबर
पालघर ( एच लोखंंडे ) मुंबई – चिंचपोकळी येथील, श्री. विजय उर्फ बाळ पंडित-ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्र लेखक- पत्रकार, यांच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात योगदानाबद्दल कार्य, तसेच त्यांनी लिहिलेल्या अनेक कथा – लेखन / नाट्य- लेखन / एकांकिका लेखन / वृत्त – पत्रे लेखन / वृत लेखन या कार्याची दखल,” स्वतंत्र्य कोकण राज्य अभियान, मुंबई यांच्या तर्फे सामाजिक व पत्रकारितेतील उत्कृष्ठ योगदाना बद्दल त्यांना, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी, मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान मुंबई येथील कार्यक्रमाचे प्रमुख तथा पत्रकार श्री.सचिन कळझुनकर यांच्या हस्ते व मान्यवरांचा उपस्थित. कोकण रत्न पदविका पुरस्कार / प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित / गौरवण्यात आले. त्यावेळी मान्यवर यांच्या हस्ते, मुंबई पासून सिंधुदुर्ग पर्यंत कोकणातील उल्लंखनीय समाजिक कार्यकरणा -या व्यक्तींना, मानपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्याला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले होते.
श्री विजय उर्फ बाळ पंडित हे विविध सामाजिक संस्थेशी निगडित असून ते अनेक वर्षांपासून पत्रलेखक व पत्रकारिता करीत आहेत. या पूर्वी श्री. बाळ पंडित यांना, अखिल भारतीय दलित साहित्य ऑकडमी, दिल्ली, टाटा मेमोरियल सेंटर, मराठी वृतपत्र लेखक संघ, महाराष्ट्र टाइम्स सिटीझन रिपोर्टर, कोल्हापूर साहित्य रत्न पुरस्कार, महापौर पुरस्कार व अन्य सामाजिक संस्थेने त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविले आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन – संस्थापक अध्यक्ष -संजय कोकरे, मुंबई अध्यक्ष – धनंजय कुवेसकर, कोषाध्यक्ष – राजेंद्र सुर्वे, सल्लागार – दिलीप लाड, बापू परब, अजित गोरुले, युवा नेते सचिन गावंडे, निहार संजय कोकरे, अनिकेत चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी मुंडये यांनी केले.