Uncategorized

मराठवाडा इतिहास परिषदेचे ४५ वे अधिवेशन चिश्तिया महाविद्यालय, खुलताबाद येथे संपन्न.

मराठवाडा इतिहास परिषदेचे ४५ वे अधिवेशन चिश्तिया महाविद्यालय, खुलताबाद येथे संपन्न.
खुलताबाद दि. १५ (डॉ. दत्तात्रय शिंदे )

मराठवाडा इतिहास परिषदेचे दोन दिवसीय ४५ वे अधिवेशन चिस्तीया महाविद्यालय, खुलताबाद येथे यशस्वी आले. अधिवेशनाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रो. डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी कुलगुरूंनी इतिहासाच्या चिकित्सक अध्ययनाची गरज अधोरेखित केली. “इतिहासातील घटना आपल्याला बोध देतात. त्यातून चांगले-वाईट यांचे भान ठेवत चांगल्याचा स्वीकार व वाईटाचा त्याग करणे आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
अधिवेशनाचे प्रस्ताविक प्रा. सूर्यवंशी यांनी करत, अधिवेशनाची उद्दिष्टे, महत्त्व व परिषदेची शैक्षणिक परंपरा याचा आढावा घेतला.
बीजभाषण डॉ. सुनिता बोर्डे खडसे यांनी केले. त्यांनी स्त्रीवादी लेखनाचे दुर्लक्षित स्वरूप, इतिहासातील बदलती प्रवृत्ती, तसेच अभ्यासक्रमामध्ये इतिहासाची होत असलेली मोडतोड यावर थेट व मार्मिक भाष्य केले.
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. वेंकटेश लांब यांनी मराठवाडा इतिहास परिषदेच्या कार्याचे कौतुक करत स्थानिक इतिहासाच्या अभ्यासातून मराठवाड्याचा इतिहास अधिक समृद्ध होत असल्याचे सांगितले.
डॉ. सोमनाथ रोडे यांनी परिषदेच्या माध्यमातून आजवर प्रकाशित झालेल्या दर्जेदार संशोधनाची विशेष नोंद केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आसिफ झकेरिया यांनी मनोगत व्यक्त करून परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. नारायण सूर्यवंशी, नितीन बावळे, प्राचार्य सोमनाथ रोडे, मुंबई विद्यापीठाचे प्रा. संदेश वाघ, डॉ. जी. के. माने, संस्थेचे उपाध्यक्ष मोहम्मद शाकेर, प्रा. गनी पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
परिषद यशस्वी पार पाडण्यात महत्वाची भूमिका निभावणारे प्रा. डॉ. हरी नारायण जमाले, अध्यक्ष इतिहास अभ्यास मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, हे स्थानिक सचिव म्हणून परिषदेची धुरा स्वतःकडे घेऊन आपल्या नेतृत्व कौशल्याचे दर्शन त्यांच्या कार्यातून दिसून आले.
परिषदेत प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहासावर एकूण १०० पेक्षा अधिक संशोधकांनी संशोधन पेपर सादर व वाचन केले. तर परिषदेस महाराष्ट्र व इतर राज्यातील मिळून ४०० पेक्षा अधिक संशोधक, अभ्यासक व प्राध्यापक वर्ग नोंदणी करून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी समारोप समारंभास विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. वाल्मीक सरवदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. अपर्णा पाटील आणि उर्दू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहंमद अय्युब उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा डॉ हरी जमाले सर यांनी अत्यंत संयत, प्रवाही आणि सर्वसमावेशक पद्धतीने केले. त्यांच्या शब्दांत आदर, कृतज्ञता आणि सकारात्मकता स्पष्ट जाणवली. त्यांनी उपस्थित सर्वांचे अतिशय नेमके, सर्वसमावेशक आणि मानला स्पर्श करणारे आभार प्रदर्शन केले.
परिषद अत्यंत यशस्वीपणे पार पडली असून संशोधन, इतिहासलेखन व शैक्षणिक देवाणघेवाणीसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button