धर्मसेवक डॉ.सोन्या पाटील यांच्या समाजसेवेच्या कार्याला नवा वेगः महिला आघाडीची नव्याने बांधणी मजबूत…
समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य – महिला आघाडी पद नियुक्त्या जाहीर…

धर्मसेवक डॉ.सोन्या पाटील यांच्या समाजसेवेच्या कार्याला नवा वेगः महिला आघाडीची नव्याने बांधणी मजबूत…
समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य – महिला आघाडी पद नियुक्त्या जाहीर…
भिवंडी (स्व.रा.तो): समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व धर्मसेवक डॉ. श्री. सोन्या काशिनाथ पाटील यांच्या प्रेरणेने गेल्या २३ वर्षांपासून ठाणे व पालघर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी तसेच वंचित घटकांमध्ये विविध सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. यात आदिवासी महिलांना साडी-मिठाई वाटप, मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वितरण, आरोग्य तपासणी शिबिरे, स्वयंरोजगार प्रशिक्षण, नेत्र चिकित्सा शिबिरे, रक्तदान शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा महोत्सव अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
आजच्या जगात माणुसकी हरवत चालली असताना ती जपण्याची गरज अधिक भासते. “इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधणे व तळागाळातील लोकांच्या समस्या जाणून त्यांचे निरसन करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे हेच खरे समाजसेवा तत्त्व आहे,” असे मार्गदर्शन प्रदेश कार्यकारिणी सदस्य व दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील यांनी केले.
ते श्री वरदान मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नारपोली, भिवंडी येथे आयोजित महिला आघाडी पद नियुक्ती सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
या वेळी जिल्हाध्यक्षा सौ. नलिनी चौधरी म्हणाल्या, “महिला आघाडीतील प्रत्येक महिला पदाधिकाऱ्यांनी निस्वार्थ भावनेने ‘दादा’ म्हणजेच संस्थापक डॉ. सोन्या पाटील यांच्यासोबत काम करणे गरजेचे आहे. संस्थेचा कोणताही कार्यक्रम असो, त्यात महिलांनी सक्रिय सहभाग देऊन समाजसेवेची साखळी अधिक मजबूत करावी.”
नवीन पद नियुक्त्या
समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य – महिला आघाडीच्या पुढील मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. सोन्या काशीनाथ पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील आणि ठाणे जिल्हाध्यक्षा सौ. नलिनी जनार्दन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आल्या.
ठाणे जिल्हा महिला आघाडी:
उपाध्यक्ष – सौ. विजयश्री नरेश गवळी
ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष – सौ. सुलोचना यशवंत मुकादम
भिवंडी विभाग:
भिवंडी शहर अध्यक्षा – सौ. उज्वला किशोर चौधरी
भिवंडी तालुका अध्यक्षा – सौ. संगीता राजेश गायकवाड
टेमघर विभाग प्रमुख – सौ. नम्रता गणेश चौधरी
कार्यक्रमातील उपस्थिती
या सोहळ्यास समाज कल्याण न्यासचे वरिष्ठ पदाधिकारी जयवंत काशिनाथ पाटील, प्रितेश सोन्या पाटील व इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. नलिनी चौधरी यांनी केले.
–