Uncategorized

पालघर जिल्ह्यातील नगरपालिकांवर भाजप–शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व

पालघर जिल्ह्यातील नगरपालिकांवर भाजप–शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व
पालघर | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून जिल्ह्यात भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विविध नगरपरिषदांमध्ये दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे.
जव्हार नगरपरिषदेत एकूण २० जागांपैकी भाजपने १४ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. शिवसेना (शिंदे गट) २, अजित पवार राष्ट्रवादी ३ तर शरद पवार राष्ट्रवादीला १ जागा मिळाली आहे. भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा उदावंत यांनी विजय मिळवला आहे.
पालघर नगरपरिषदेत एकूण ३० जागांपैकी शिवसेना (शिंदे गट) १९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला ८ तर ठाकरे गटाच्या शिवसेनेला ३ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना (शिंदे गट) चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम घरत विजयी झाले आहेत.
वाडा नगरपंचायतीत एकूण १७ जागांपैकी भाजपने १० जागा जिंकून सत्ता मिळवली आहे. शिवसेना (शिंदे गट) ३, ठाकरे शिवसेना १, अजित पवार राष्ट्रवादी १, शरद पवार राष्ट्रवादी १ आणि काँग्रेस १ जागेवर विजयी झाली आहे. भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रीमा गंधे यांनी विजय संपादन केला आहे.
दरम्यान, डहाणू नगरपरिषदेत एकूण २७ जागांपैकी भाजपने १७ जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला ८ तर शिवसेना (शिंदे गट) ला २ जागा मिळाल्या आहेत. मात्र नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार राजेंद्र माच्छी यांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या निकालांमुळे पालघर जिल्ह्यात भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांची राजकीय पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button