Uncategorized
शिवसेना शिंदे गटातून अमोल पाटील यांचा पालघर नगरसेवकपदी विजय

शिवसेना शिंदे गटातून अमोल पाटील यांचा पालघर नगरसेवकपदी विजय
पालघर (प्रतिनिधी)पालघर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल पाटील यांनी नगरसेवकपदावर दणदणीत विजय मिळवला आहे. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने अमोल पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
विकासकामे, स्थानिक प्रश्नांची जाण आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यामुळे मतदारांनी अमोल पाटील यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडून दिले. त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जल्लोषात विजय साजरा करण्यात आला.
या विजयानंतर पालघर नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाची ताकद अधिक बळकट झाली असून, आगामी काळात पालघर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे अमोल पाटील यांनी सांगितले.