Uncategorized

पहिल्याच निवडणुकीत तरुण तडफदार जस्विन घरत यांचा दणदणीत विजय

पहिल्याच निवडणुकीत तरुण तडफदार जस्विन घरत यांचा दणदणीत विजय
पालघर (प्रतिनिधी)शिवसेना शिंदे गटातून पहिल्यांदाच नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळालेल्या तरुण व तडफदार जस्विन घरत यांनी निवडणुकीत घवघवीत विजय मिळवला आहे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत त्यांनी राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे.
जस्विन घरत यांनी प्रचारादरम्यान सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि युवकांचे प्रश्न यावर भर दिला. त्यांच्या साधेपणा, काम करण्याची तळमळ आणि सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत विजयाची संधी दिली.
या विजयानंतर परिसरात आनंदाचे वातावरण असून, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत व जल्लोषात विजय साजरा केला. युवकांना संधी देणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या धोरणाला मतदारांनी दिलेली ही पावती असल्याचे बोलले जात आहे.
विजयानंतर बोलताना जस्विन घरत यांनी, “हा विजय जनतेचा आहे. दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि प्रभागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन,” असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button