Uncategorized

पालघर जिल्ह्यात सत्ता समसमान
दोन ठिकाणी शिंदे गट, दोन ठिकाणी भाजपाची बाजी

पालघर जिल्ह्यात सत्ता समसमान
दोन ठिकाणी शिंदे गट, दोन ठिकाणी भाजपाची बाजी
पालघर (प्रतिनिधी)पालघर जिल्ह्यातील जव्हार, वाडा, पालघर आणि डहाणू या चार नगर परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून जिल्ह्यातील राजकीय सत्ता समसमान विभागली गेली आहे. पालघर आणि डहाणू नगर परिषदांवर शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली, तर वाडा आणि जव्हार येथे भाजपाने सत्ता काबीज केली आहे.
जव्हार नगर परिषदेत भाजपाच्या पूजा उंदावत यांनी नगराध्यक्षपद पटकावले आहे, तर वाडा नगर परिषदेत भाजपाच्या रिमा गंधे या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत. दुसरीकडे पालघर नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे उत्तम घरत यांनी नगराध्यक्षपदावर आपली मोहर उमटवली आहे. डहाणू नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र माच्छी यांनी विजय मिळवत सत्ता कायम राखली आहे.
या निकालांमुळे पालघर जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील राजकीय बरोबरी स्पष्ट झाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात तीव्र चुरस पाहायला मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button