Uncategorized

मर्म ‘ कथासंग्रहाचे प्रकाशन

‘ मर्म ‘ कथासंग्रहाचे प्रकाशन

पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कला क्रीडा महोत्सव उद्घाटन प्रसंगी लेखक सुनील मंगेश जाधव यांच्या ‘मर्म ‘ कथासंग्रहाचे प्रकाशन उमरोळी येथे अनेक मान्यवरांच्या हस्ते शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले हे पुस्तक डिम्पल पब्लिकेशन यांनी प्रकाशित केले आहे.
याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक व संघटनेचे माजी अध्यक्ष मा. वसंत जाधव यांनी मर्म ही जीवनाचा शोध घेणारी ज्ञानात्मक व मूल्यात्मक प्रक्रिया असून जाधव यांच्या कथा समस्त सामाजिक घटकांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. कथेतील प्रत्येक घटना व प्रसंग प्रत्येकाच्या जीवनातीलच असल्याचे स्पष्ट करून जाधव हे समाजासाठी भूषणावह असल्याचे स्पष्ट केले. उमरोळी ग्रामपंचायतीचे सरपंच मा. प्रभाकर पाटील यांनी सुनील जाधव हे उमरोळीचे सुपुत्र असून त्यांचे आतापर्यंत आठ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांच्या सर्व पुस्तकांना एकूण 42 राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याचा सार्थ अभिमान आहे. त्यांचा मर्म कथासंग्रह सध्याच्या काळात प्रबोधन करणारा असल्याचे स्पष्ट केले. प्रसिद्ध उद्योजक मा. संतोष वाळींजकर यांनी मर्म कथासंग्रह हा आपल्या जीवनासाठी अनमोल ठेवा असून सामाजिक,कौटुंबिक व शैक्षणिक घडामोडींची वास्तववादी मांडणी करून समाज जागृती करणारा असल्याचे गौरोदगार काढले.
कार्यक्रमास समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. त्यांनी सुनील जाधव यांना पुस्तक लेखनाबद्दल शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष मा. सुभाष पाटील यांनी केले आभार प्रदर्शन उपाध्यक्ष मा.सुधीर जाधव व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. हरेश्वर जाधव यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button