Uncategorized

जिल्ह्यातील कर्करोगरुग्णांना दिलासा कर्करोग निदान वाहन उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

जिल्ह्यातील कर्करोगरुग्णांना दिलासा कर्करोग निदान वाहन उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

   पालघर (प्रतिनिधी)  जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘कर्करोग निदान वाहन’ उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 01 ते 31 डिसेंबर या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत आतापर्यंत 3 हजार 89 नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये 55 संशयित रुग्ण आढळले आहेत.
       राज्य शासनाचा तसेच मा आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांचा फिरते कर्करोग निदान वाहन उपक्रम हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा आधार प्राप्त झाला आहे तसेच पालघरच्या दुर्गम भागात वरदान ठरत आहे.    जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ रामदास मराड यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवली जात आहे.
      कर्करोगाचे लवकर निदान करून नागरिकांना तात्काळ उपचाराखाली आणणे, मार्गदर्शन करणे तसेच कर्करोगाविषयी जागरूकता वाढविणे हा या मोहीमेचा मुख्य उद्देश आहे. विविध गावांमध्ये फिरणाऱ्या या वाहनाद्वारे मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग या तीन कर्करोगांची तपासणी करण्यात आली. या कालावधीत जिल्ह्यातील वसई, वाडा, मोखाडा, जव्हार, विक्रमगड, डहाणू आणि पालघर या 7 तालुक्यांमध्ये विविध उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र ,तालुका रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यांच्या कार्यक्षेत्रात 20 पेक्षा जास्त कॅम्प घेऊन नियोजित वेळापत्रकानुसार तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्यांचा 3000 पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला आहे.
    वाहनासोबत एक दंत मुखरोग तज्ञ (Dentist) डॉक्टर तसेच  स्त्रीरोग तज्ञ (Gynaecologist) डॉक्टर व इतर कर्मचारी उपलब्ध असतात. या आधुनिक वाहनाद्वारे  खालील तपासण्या मोफत उपलब्ध करून दिल्या जातात:
  1. मॅमोग्राफी (Mammography): स्तनाच्या कर्करोगाच्या निदानासाठी.
  2. पॅप स्मिअर (Pap Smear): गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी.
  3. तोंडी तपासणी: तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगासाठी.
  4. बायोप्सी नमुना घेऊन तपासणीस पाठवणे.
    तपासणीचा संक्षिप्त अहवाल (01 ते 24 डिसेंबर 2025 पर्यंत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button