Uncategorized

अल्पवयीन लहान मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, पालक व शाळांना महत्त्वाचे आवाहन

अल्पवयीन लहान मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, पालक व शाळांना महत्त्वाचे आवाहन
सफाळे – पो. ठाणे श्री.दत्ता शेळके सपोंनी
३ जानेवारी
सफाळा ( एच लोखंंडे ) सफाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी श्री.दत्ता शेळके सपोंनी हे गस्तीवर फिरत असताना, त्यांच्या निदर्शनास आले आहे की, सफाळा पोलीस ठाणे हद्दीतील अनेक शाळा व महाविद्यालयीन शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांचे पालक हे आपल्या मुलांना १८ वर्षे पूर्ण झालेली नसताना आणि वाहन चालविण्याचा वैध परवाना ( लायन्स ) नसताना दुचाकी / चारचाकी वाहने चालविण्यास देत आहेत. सदर ही अल्पवयीन मुले शाळा, कोचिंग क्लासेस व दैनंदिन कामांसाठी ही वाहने वापरत असल्याचे आढळून आले आहे.
ही बाब अत्यंत गंभीर, धोकादायक, बेजबाबदार व कायद्याने पूर्णतः बेकायदेशीर आहे. अल्पवयीन मुलांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यासाठी थेट पालकांना जबाबदार धरले जाणार असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये खालील कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील –
१) मोटार वाहन कायदा कलम 3, 4, 5. २) भारतीय न्याय संहिता 180 व 181, ३) किशोर न्याय (JJ) कायदा कलम 18
या कलमा अंतर्गत होणारा दंड व शिक्षा :
१) अल्पवयीन मुलाने 50 CC पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविल्यास ₹25,000/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार) दंडाची तरतूद आहे. २) गाडी चालक, गाडी मालक व अल्पवयीन मुलीना गाडी चालविण्यास देणारे पालकांना 3 वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते. ३)अपघात झाल्यास संबंधित वाहनाचा विमा (Insurance Claim) नाकारला जाऊ शकतो. ४) गुन्हा नोंद झाल्यास संबंधित अल्पवयीन मुलांना भविष्यात नोकरी, पासपोर्ट, चारित्र्य प्रमाणपत्र इत्यादी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. ५) दंडात्मक कारवाई झाल्यास 25 वर्षे वयापर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मिळणार नाही, तसेच संबंधित वाहनाची नोंदणी एक वर्षापर्यंत रद्द केली जाऊ शकते.
आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, सफाळा व पालघर पोलीस सर्व पालकांना कळकळीचे आवाहन करीत आहेत की – आपल्या अल्पवयीन पाल्यांच्या ताब्यात
🛵 🏍️ 🚔 कोणतेही वाहन देऊ नये. २)आपल्या 🧟🧟‍♀️ मुलांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य द्यावे. ३) वाहनाऐवजी सायकल 🚴‍♀️ किंवा ई-सायकल हा सुरक्षित पर्याय उपलब्ध करून द्यावा.
सर्व शाळा व शिक्षण संस्थांनी✍️✍️ आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे अशी विनंती करण्यात येत आहे.
📞 आपत्कालीन मदतीसाठी
सफाळा पोलीस ठाणे – हेल्पलाईन क्रमांक : 112

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button