Uncategorized

जिल्हा परिषद पालघर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जिल्हा परिषद पालघर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पालघर (पंढरीनाथ गायकवाड)आज दिनांक 3/12/ 2026 रोजी जिल्हा परिषद पालघर येथे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कनिष्ठ प्रशासन अधिकारी विजय वळींकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांनी १९व्या शतकात समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व स्त्रीशिक्षणावरील बंधनांना छेद देत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे.

उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचा आदर्श अंगीकारण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button