Uncategorized

झरी कॉलेजच्या सहा आदिवासी विदयार्थ्यांची ‘एचपीसीएल सुपर ५०’ अंतर्गत निवड

झरी कॉलेजच्या सहा आदिवासी विदयार्थ्यांची ‘एचपीसीएल सुपर ५०’ अंतर्गत निवड

तलासरी दि. १२(डॉ. दत्तात्रय शिंदे)

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉपोरेशन लिमिटेड (एच पी सी एल) यांचा सी एस आर अंतर्गत राबवला जाणारा ‘एचपीसीएल सुपर ५०’ हा उपक्रम असुन, आर्थिक दृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थ्यांना नीट/जेईई सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत निवासी प्रशिक्षण दिले जाते.यात नुकतेच ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय झरी येथील विदयार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कॉलेजमधील अतुल दिपक धांगडा, अश्विन जयेश सुथेडिया,अमुल प्रकाश अंधेर,अंकुश दिपक अंधेर,स्नेहल राजेश कोंढारी आणि प्रितम झिपरभाई गांगोडा या सहा विदयार्थ्यांची या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक उपक्रमाच्या मुलाखतीसाठी निवड झाली आहे.
या यशाब‌द्दल संस्थासंचालक फादर नीलम, फादर सॅबि कोरिया, मुख्याध्यापिका सिस्टर बस्तियान, शिक्षकवृंद व पालकांनी वि‌द्यार्थ्यांचे अभिनंदन केले असुन आगामी मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या असून ही निवड म्हणजे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचा परिणाम असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button