Uncategorized

मुलुंडमध्ये युतीचा फटका! शिंदे गटात नाराजी, अपक्ष सुजाता पाठक ठरल्या भाजपसाठी डोकेदुखी

मुलुंडमध्ये युतीचा फटका! शिंदे गटात नाराजी, अपक्ष सुजाता पाठक ठरल्या भाजपसाठी डोकेदुखी
मुलुंड | प्रतिनिधी
मुलुंड विधानसभा क्षेत्रात शिवसेना (शिंदे गट) व भाजप यांच्यातील युतीचा फटका थेट शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना बसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मुलुंडमधील सहाही जागांवर भाजपने आपलेच उमेदवार जाहीर केल्याने शिंदे गटाकडे एकही जागा न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
याच नाराजीतून शिंदे गटाशी संबंधित पाच जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, काल पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून उमेदवारी मागे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला. या दबावाला बळी पडत चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
परंतु, माजी नगरसेविका पद भूषवलेल्या सुजाता राजेश पाठक यांनी मात्र दबावाला न जुमानता आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे पक्षांतर्गत नाराजी वाढली असली तरी, त्यांच्या वॉर्डमध्ये मात्र मतदारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
स्थानिक जनतेचा स्पष्ट कौल अपक्ष उमेदवाराच्या बाजूने झुकताना दिसत असून, सुजाता पाठक यांची उमेदवारी आता भाजपसाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. “पक्षापेक्षा व्यक्ती महत्त्वाची” असा संदेश मतदार देताना दिसत असून, ही अपक्ष उमेदवारी भाजपवर निश्चितच भारी पडू शकते, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.
मुलुंडमधील ही राजकीय घडामोड आगामी निवडणुकीत मोठे उलथापालथ घडवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 🔥🗳️

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button