Uncategorized

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ व ‘नाला खोलीकरण रुंदीकरण’ योजनेसाठी संस्थांनी सहभागासाठी जिल्हा जलसंधारण विभागाशी संपर्क साधावा

‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ व ‘नाला खोलीकरण रुंदीकरण’ योजनेसाठी संस्थांनी सहभागासाठी जिल्हा जलसंधारण विभागाशी संपर्क साधावा

पालघर (प्रतिनिधी)दिनांक ४ जानेवारी : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण ह्या दोन्ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबविण्यात येत आहेत.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार व नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेंतर्गत आराखडयात समाविष्ट कामे पूर्ण करण्याकरीता धर्मदाय आयुक्त कंपनी कायदा २०१३ कलमाअंतर्गत सहकारी सोसायटी कायदा १८६०, सार्वजनिक विश्वस्त कायदा, १९५० यापैकी एका कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था तसेच संदर्भीय शासन निर्णयातील नमूद आशासकीय संस्था निवडीच्या निकषात बसणाऱ्या व सदर योजनेअंतर्गत समाविष्ट काम करण्यास इच्छुक असेल तर अशा संस्थेने या कार्यालयास संपर्क साधावा. अधिक माहिती साठी सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी दिपक महाजन भ्रमणध्वनी ८१४९४७९४६८ या क्रमांकावर संपर्क साधा तसेच सदर कामाबाबतची सर्व माहिती या कार्यालयाच्या नोटिस बोर्ड वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button