Uncategorized

शिवसेना डहाणू तालुका प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त; मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न

शिवसेना डहाणू तालुका प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त; मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न

डहाणू/प्रसाद भालेराव
राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व शिवसेना डहाणू तालुकाप्रमुख हेमंत धर्ममेहेर यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने वाढदिवसानिमित्त चारोटी येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली, तर मोठ्या संख्येने रुग्णांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
या शिबिरास गरजू नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण १२७ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. त्यापैकी ५० रुग्णांची सर्वसाधारण तपासणी करण्यात आली, तर ४ रुग्णांची पुढील शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. नेत्र तपासणी शिबिराअंतर्गत ८५ गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
शिबिरामध्ये जनरल सर्जन, बालरोग, कर्करोग, किडनी, एम.डी. मेडिसिन, स्त्रीरोग, अस्थिरोग व हृदयरोग विभागातील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून योग्य उपचार व मार्गदर्शन केले. रक्तदाब, मधुमेह, दमा, किडनी स्टोन, गर्भाशयाच्या गाठी, मणक्याचे विकार, अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी यांसारख्या आजारांवर सविस्तर सल्ला देण्यात आला.
गोर-गरीब व गरजू नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना पक्षाचे उपनेते निलेश सांबरे, शिवसेना पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संखे , डहाणू नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजू माच्छी, पालघर विधानसभेचे माजी आमदार अमित घोडा व श्रीनिवास वनगा, माजी नगराध्यक्ष मिहीर शहा तसेच रवींद्र फाटक,डहाणू नगरपरिषदेचे नगरसेवक वरून पारेख, तालुकाप्रमुख संतोष देशमुख, चारोटी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच प्रणय मेहेर,ऍड.विराज गडग,समीर सागर, जिजाऊ संस्थेचे पालघर जिल्हाध्यक्ष जावेद खान, डहाणू तालुका अध्यक्ष पिंटू रिंजड, तलासरी नगरपंचायतीचे नगरसेवक पंकज वसावे, कल्पेश भावर,यागेश धानमेहेर, संदीप धानमेहेर, संदीप दळवी, जानी वरठा, अजय मेढा आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button