Uncategorized

जिल्हा परिषद पालघर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

जिल्हा परिषद पालघर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

पालघर (प्रतिनिधी)आज दिनांक 12 जानेवारी रोजी जिल्हा परिषद पालघर येथे आज राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राजमाता जिजाऊ (जिजाबाई) या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता होत्या, ज्यांनी स्वराज्याची संकल्पना रुजवून, त्यांना संस्कार देऊन आणि प्रतिकूल परिस्थितीत खंबीरपणे पाठिंबा देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली; त्यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.यावेळी राजमाता जिजाऊ यांनी घडवलेले संस्कार, त्यांचे दूरदर्शी नेतृत्वयावेळी राजमाता जिजाऊ यांनी घडवलेले संस्कार, त्यांचे दूरदर्शी नेतृत्व तसेच स्वामी विवेकानंद यांनी युवकांना दिलेला आत्मविश्वास राष्ट्रभक्ती व समाजसेवेचा संदेश यांचे स्मरण करण्यात आले.

या प्रसंगी प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं)अशोक पाटील,जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी, गट विकास अधिकारी पालघर यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button