Uncategorized

बोईसरमध्ये 24×7 अत्याधुनिक कार्डिएक कॅथलॅब सुरू हृदयविकार रुग्णांसाठी वरद हॉस्पिटलची ऐतिहासिक आरोग्यसेवा

बोईसरमध्ये 24×7 अत्याधुनिक कार्डिएक कॅथलॅब सुरू हृदयविकार रुग्णांसाठी वरद हॉस्पिटलची ऐतिहासिक आरोग्यसेवा
बोईसर | प्रतिनिधी
हृदयविकार हा कोणतीही पूर्वसूचना न देता येतो आणि अशा वेळी वेळेवर उपचार मिळणे म्हणजेच जीव वाचण्याची हमी असते. हीच गरज ओळखून बोईसर येथील वरद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक कार्डिएक कॅथलॅबसह 24×7 पूर्णवेळ कार्डिएक युनिट सुरू करण्यात आले आहे.
ही सुविधा बोईसरसह पालघर, डहाणू, तलासरी व परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.
आतापर्यंत या भागातील हृदयविकाराचे रुग्ण उपचारासाठी मुंबई किंवा गुजरात येथे जाण्यास भाग पडत होते. त्यामुळे वेळ, खर्च आणि जीविताला धोका वाढत होता. मात्र आता ही अडचण संपुष्टात आली असून, मोठ्या शहरांइतकी प्रगत हृदयसेवा बोईसरमध्येच उपलब्ध झाली आहे.
अनुभवी हृदयरोग तज्ज्ञांची 24×7 सेवा
या कार्डिएक युनिटमध्ये अनुभवी व विश्वासार्ह हृदयरोग तज्ज्ञांची टीम दिवसरात्र सेवेत उपलब्ध आहे.
डॉ. नील स्नेहल (DM कार्डियोलॉजी) – दररोज OPD व 24×7 आपत्कालीन सेवा
डॉ. विशाल पावळ (DNB कार्डियोलॉजी)
डॉ. आनंद पारिख (DNB कार्डियोलॉजी)
हृदयविकाराचा झटका, छातीत दुखणे, अचानक श्वास लागणे अशा गंभीर परिस्थितीत तात्काळ निर्णय व उपचार देण्यासाठी ही टीम सदैव सज्ज आहे.
एका छताखाली अत्याधुनिक हृदय उपचार
वरद हॉस्पिटलमध्ये खालील प्रगत उपचार व प्रक्रिया उपलब्ध आहेत :
अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी
पेसमेकर बसविणे
मुलांच्या हृदयातील छिद्र डिव्हाइसद्वारे बंद करणे
मायट्रल, एओर्टिक व पल्मोनरी व्हॉल्व्ह बलून दुरुस्ती
कोआर्कटोप्लास्टी
डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) व पल्मोनरी एम्बोलिझम उपचार
आयव्हीसी फिल्टर इम्प्लांटेशन
सरकारी योजनांतर्गत मोफत उपचार सुविधा
पैशांअभावी उपचार थांबू नयेत यासाठी येथे
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना व ESIC योजनांतर्गत उपचार सुविधा उपलब्ध असून, या योजनांमध्ये मोफत अँजिओप्लास्टीची सुविधा दिली जाते.
दूरदृष्टीतून उचललेले पाऊल
डॉक्टरांची अनुपलब्धता ही समस्या ओळखून वरद हॉस्पिटलचे संचालक डॉ. सैदा लिंगनवाड आणि CEO श्री. कपिल माने यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हे 24×7 कार्डिएक युनिट सुरू झाले आहे.
हा उपक्रम म्हणजे बोईसर व परिसरातील नागरिकांच्या जीवितासाठी दिलेली एक महत्त्वाची भेट ठरत आहे.
लक्षणे दुर्लक्षित करू नका
छातीत दुखणे, डाव्या हातात वेदना, श्वास लागणे, घाम येणे, मळमळ किंवा भोवळ येणे अशी लक्षणे दिसताच तात्काळ वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
संपर्क :
वरद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,
नवापूर नाका, बोईसर
📞 7788996613

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button