Uncategorized

वयाच्या ६५व्या वर्षी वकील दीपक चिंतामण सावले यांची एल.एल.एम. पदवी संपादनाची प्रेरणादायी कामगिरी

वयाच्या ६५व्या वर्षी वकील दीपक चिंतामण सावले यांची एल.एल.एम. पदवी संपादनाची प्रेरणादायी कामगिरी
पालघर प्रतिनिधी —
पालघर शहरातील प्रसिद्ध व अनुभवी वकील अँड. दीपक चिंतामण सावले यांनी वयाच्या ६५व्या वर्षी सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथून एल.एल.एम. (मास्टर ऑफ लॉ अँड लेजिस्लेचर) ही पदव्युत्तर पदवी उत्कृष्ट गुणांसह यशस्वीरित्या संपादन केली आहे.
एल.एल.एम. अभ्यासक्रमातील सर्व विषयांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत ही पदवी मिळवली असून, त्यांच्या या यशामुळे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद व प्रेरणा निर्माण झाली आहे. दीर्घकाळ न्यायालयीन कामकाजात सक्रिय असतानाही उच्च शिक्षणाचा ध्यास जपत त्यांनी हे यश संपादन केले, हे विशेष उल्लेखनीय ठरत आहे.
या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना अँड. सावले म्हणाले,
“या वयात हा शैक्षणिक प्रवास सोपा नव्हता. मात्र प्रामाणिक कष्ट, समर्पण आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन यामुळेच हा टप्पा पूर्ण करता आला. भविष्यात सामाजिक न्याय आणि कायदा क्षेत्रात अधिक प्रभावी कार्य करण्याचा माझा मानस आहे.”
सन १९८७ पासून वकिली व्यवसायात सक्रिय असलेल्या अँड. दीपक चिंतामण सावले यांनी एल.एल.एम. अभ्यासक्रमादरम्यान त्यांच्या विद्यमान व्यावसायिक कौशल्यांना अधिक व्यापक स्वरूप देत न्यायव्यवस्थेतील गुंतागुंतीच्या कायद्याचे सखोल ज्ञान प्राप्त केले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच विधी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक व विधी क्षेत्रातूनही अँड. सावले यांच्या या प्रेरणादायी यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button