Uncategorized

नेपाळमध्ये 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत गोल्ड पथकावर मोहर उमटविणाऱ्या प्रेम पुरकर चे चारठाणा गावात जंगी मिरवणूक !

नेपाळमध्ये 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत गोल्ड पथकावर मोहर उमटविणाऱ्या प्रेम पुरकर चे चारठाणा गावात जंगी मिरवणूक !

प्रतिनिधी / विशाल दांडगे

जळगाव (१३ जानेवारी २०२६)

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथील प्रेम श्रीकृष्ण पुरकर याने नेपाळ या देशांमध्ये पोखरा येथील रंगसाला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित युथ गेम इंडो नेपाळ इंटरनॅशनल सिरीज २०२६ स्पर्धेमध्ये 200 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक २३ सेंकद ८७ पॉइंट मध्ये पार करून प्रथम क्रमांक मिळवला आहे. कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलकीची असून सुद्धा प्रेम याने आपली जिद्द चिकाटी कायम ठेवली आणि यश प्राप्त केले. ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या चारठाणा गावाचे सुपुत्र प्रेम श्रीकृष्ण पुरकर याचे गावात दणदणीत स्वागत भव्य मिरवणूकीने गावात जल्लोष करण्यात आला. गावाचे नाव रोशन केल्याने प्रेम पुरकर घरी परतल्यानंतर गावात उत्साह उसळला, गावाच्या प्रवेश द्वारापासून त्याला फुलांचा हारांनी ,गुलाल उधळून आणि घोषणाबाजी स्वागत करण्यात आला. ग्रामस्थ , महिला व युवक,नातेवाईक मोठ्या संख्येने जमले होते. गावातून घोषणाबाजी करत भव्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले
शेतकऱ्यांच्या मुलांची आंतरराष्ट्रीय भरारी! नेपाळमध्ये कुऱ्हा काकोड्याच्या खेळाडूंनी रचला इतिहास.
♦️पोखरा स्टेडियमवर घुमला मुक्ताईनगरचा आवाज; ५ ♦️धावपटूंनी जिंकले सिल्व्हर मेडल!
♦️परिस्थितीवर मात करत ‘कुऱ्हा’च्या पोरांनी मारली बाजी; वाचा त्यांच्या यशाची थरारक कथा.
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील मुले काय करू शकतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. नेपाळमधील पोखरा येथील रंगसाला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित ‘युथ गेम इंडो-नेपाळ इंटरनॅशनल सिरीज २०२६’ मध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परिसरातील खेळाडूंनी दैदीप्यमान कामगिरी केली आहे. ७ ते ९ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत BOY U-17 गटात ४×१०० मीटर रिले स्पर्धेत या खेळाडूंनी फायनलमध्ये द्वितीय क्रमांक पटकावत सिल्व्हर मेडल (रौप्य पदक) व ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

यशाचे_मानकरी:

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत पदक जिंकणाऱ्या संघात खालील गुणवंत खेळाडूंचा समावेश आहे:
१. संकेत विनोद पाटील (इयत्ता ९ वी)
२. ओम रामेश्वर तायडे (इयत्ता १० वी)
३. प्रेम श्रीकृष्ण पुरकर (इयत्ता ११ वी)
४. हेमंत अर्जुन चोपडे (इयत्ता १० वी)
५. देवेश राजू बोरसे (इयत्ता १० वी)
शेतकरी पुत्रांची गरुडझेप:
विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे या सर्व खेळाडूंचे आई-वडील शेतकरी व शेतमजूर आहेत. घरची परिस्थिती बेताची असतानाही मुलांच्या खेळाप्रती असलेली आवड ओळखून पालकांनी त्यांना खंबीर साथ दिली. योग्य पोषण, प्रशिक्षणासाठी लागणारा वेळ, आर्थिक मदत आणि घरात दिलेले सकारात्मक वातावरण यामुळे या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला. पालकांचा भावनिक आधार आणि शिस्तीमुळेच आज या मुलांचा क्रीडा क्षेत्रातील मार्ग सुकर झाला असून त्यांनी थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे.
सर्वत्र कौतुकाचा वर्षाव:
पोखरा येथील आंतरराष्ट्रीय मैदानावर या ग्रामीण खेळाडूंनी दाखवलेल्या कौशल्यामुळे संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे. या यशाबद्दल जिल्ह्यातून ग्रामस्थांच्या वतीने सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
“प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कुऱ्हा काकोडा परिसरातील या खेळाडूंनी मिळवलेले हे यश आगामी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button