Uncategorized

पत्रकार सतीश पाटील यांना ‘स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव सन्मान’ जाहीर

पत्रकार सतीश पाटील यांना ‘स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव सन्मान’ जाहीर
१२ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये गौरव सोहळा संपन्न
रिष्रा (जि. हुगळी, पश्चिम बंगाल) :
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय, निर्भीड व समाजाभिमुख कार्याची दखल घेत पत्रकार सतीश पाटील यांची ‘स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव सन्मान’ साठी निवड करण्यात आली आहे. हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार सेवा जीव कल्याण ट्रस्ट, रिष्रा (जिल्हा हुगळी, पश्चिम बंगाल) यांच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.
स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून दि. १२ जानेवारी २०२६ रोजी रिष्रा येथे हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्याने पत्रकार सतीश पाटील यांना हा सन्मान टपालाद्वारे पाठवण्यात आला असल्याची माहिती ट्रस्टकडून देण्यात आली.
पत्रकार सतीश पाटील यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, सामान्य जनतेच्या अडचणी, अन्यायग्रस्तांचे मुद्दे तसेच लोकहिताशी संबंधित विषय सातत्याने आणि निर्भीडपणे मांडले आहेत. त्यांच्या या मूल्याधिष्ठित व समाजोपयोगी कार्याची दखल घेत ट्रस्टकडून हा राष्ट्रीय पातळीवरील सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
स्वामी विवेकानंदांनी मांडलेले मानवतावाद, सेवाभाव व राष्ट्रनिर्मितीचे विचार आज भारतासह संपूर्ण आशियात प्रेरणादायी ठरत आहेत. इंडोनेशियामधील पंचशील तत्त्वज्ञानाप्रमाणेच विवेकानंदांचे विचार समाजातील समता, कर्तव्यभावना आणि नैतिक मूल्यांना अधोरेखित करतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या सन्मानाच्या घोषणेमुळे पत्रकारिता क्षेत्रात तसेच सामाजिक वर्तुळातून पत्रकार सतीश पाटील यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक पत्रकारितेसाठी सर्व स्तरांतून सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button