Uncategorized

सायकलाथॉन 3.0 यशस्वीरीत्या संपन्न.

सायकलाथॉन 3.0 यशस्वीरीत्या संपन्न
पालघर, दि. 18 (प्रतिनिधी):
रोटरॅक्ट क्लब ऑफ पालघर यांच्या वतीने रविवारी, 18 जानेवारी 2026 रोजी पालघर येथे ‘सायकलाथॉन 3.0’ या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7.30 वाजता झाली. हा उपक्रम अध्यक्ष रोटरॅक्ट. गार्गी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला असून रोटरॅक्ट. सानू पासवान यांनी प्रकल्प अध्यक्ष (Project Chairman) म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.
या कार्यक्रमासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. विनायक नारायले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थित सायकलपटूंना मार्गदर्शन करत सामाजिक जबाबदारी, शारीरिक तंदुरुस्ती आणि समाजाच्या सर्वांगीण आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले.
सायकलाथॉन 3.0 आयोजनामागील मुख्य उद्देश ‘अ‍ॅनिमिया मुक्त भारत’ या राष्ट्रीय मोहिमेबाबत जनजागृती करणे हा होता. सायकलिंगच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देत अ‍ॅनिमियामुक्त समाज घडवण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न होता.
सायकलाथॉनसाठी झुडिओ येथून सुरू होणारे तीन मार्ग निश्चित करण्यात आले होते. त्यामध्ये झुडिओ ते शांतशील (18 किमी), झुडिओ ते माहिम पोलीस स्टेशन (13 किमी) तसेच झुडिओ ते टेलिफोन एक्स्चेंज या मार्गांचा समावेश होता.
या उपक्रमात एकूण 100 सायकलप्रेमींनी सहभाग नोंदवला. दहाणू, विरार, सफाळे तसेच पालघर परिसरातील सायकलपटूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींचा पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आनंदी व उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. या सायकलाथॉनच्या माध्यमातून तंदुरुस्ती, एकात्मता, सामाजिक जाणीव तसेच ‘अ‍ॅनिमिया मुक्त भारत’ या संकल्पनेचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button