आर्यन हायस्कूल, पालघर येथे अनोख्या कलेतून माघी गणपतीची भव्य सजावट


आर्यन हायस्कूल, पालघर येथे अनोख्या कलेतून माघी गणपतीची भव्य सजावट
पालघर (प्रतिनिधी) —
आर्यन हायस्कूल, पालघर येथे माजी विद्यार्थी राजेश रघुनाथ सोहनी यांनी आपल्या अनोख्या कलेतून माघी गणपतीची आकर्षक सजावट साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुख्याध्यापिका विभूती चौधरी मॅडम तसेच आर्यन हायस्कूलचे ड्रॉइंग शिक्षक माळीसर सर यांच्या सहकार्याने ही कलाकृती साकारण्यात आली.
विशेष म्हणजे, पारंपरिक वारली पेंटिंग न करता पुढ्यावर कोरल करून माघी गणपतीची सजावट तयार करण्याची ही संकल्पना असून, अशी कलाकारी पुढ्यावर प्रथमच करण्यात आल्याचे सांगितले जाते. या नवकल्पनात्मक कलेमुळे शाळेच्या परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थी व शिक्षकांनी या कलाकृतीचे मनापासून कौतुक केले आहे.
राजेश सोहनी यांनी सादर केलेली ही नवी कला पाहून उपस्थित सर्वजण भारावून गेले. पुढ्यावर कलेद्वारे साकारलेला माघी गणपती अत्यंत देखणा व भावपूर्ण दिसत असून, या कलाकृतीमुळे शाळेतील सांस्कृतिक उपक्रमांना नवे परिमाण लाभले आहे.
या अनोख्या आणि सर्जनशील कलाप्रयोगाबद्दल राजेश सोहनी यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या कलेमुळे अनेक विद्यार्थ्यांना नव्या कल्पनांद्वारे कला सादर करण्याची प्रेरणा मिळत आहे.