Uncategorized

सूर्यमुखी गणपती मंदिर देवस्थान दुसखेडा येथे प्रथम वर्षीय वर्धापन दिन साजरा.

सूर्यमुखी गणपती मंदिर देवस्थान दुसखेडा येथे प्रथम वर्षीय वर्धापन दिन साजरा

प्रतिनिधी / विशाल दांडगे

दुसखेडा : २२ जानेवारी २०२६

दुसखेडा ता. यावल येथे सूर्यमुखी गणेश मंदिर येथे विधिवत प्रथम वर्षीय वर्धापन दिन भक्तीमय वातावरणात अशोकभाई सोनवणे व त्यांच्या धर्मपत्नी अपर्णा सोनवणे सह गावातील पारस सोनवणे, विशाल दांडगे, नरेंद्र सोनवणे व पंकज सोनवणे यांच्या हस्ते पुरोहित कल्पेश महाराज यांनी पूजा होमहवन करवून घेतला.या आधी अशोक भाई सोनवणे यांनी स्वखर्चातून सूर्यमुखी गणेश मंदिर गावासाठी बांधून दिलेले आहे.श्री.अशोक भाई सोनवणे हे माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड पुणे व दुसखेडा येथील मूळ रहिवासी आहे. या आधी त्यांनी गावासाठी विविध उपक्रम राबविले आहे. इयत्ता दहावीत मागील वर्षी गरीब कुटुंबातील कुमारी कोमल सपकाळे हीने दहावीत गावातून दुसरा क्रमांक मिळवला असता तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी अशोक भाई सोनवणे यांनी घेतलेली आहे.तसेच आज सूर्यमुखी गणेश मंदिर, या मंदिराला आज एक वर्ष पूर्ण होऊन गणेश भगवान यांचा प्रथम वर्षीय वाढदिवस भक्तिमय वातावरणात साजरा करून यावेळी शिवलिंगाचा सुद्धा अभिषेक करण्यात आला.नंतर प्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. या वर्धापनदिनी गावातील दुर्वास सोनवणे, व हरिपाठातील महिला मंडळ भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पारस सोनवणे व विशाल दांडगे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button