Uncategorized

पद्मनाभ स्वामी महाराज यात्रा उत्सव दिमाखात साजरा; ११४ वर्षांची परंपरा, भाविकांची अलोट गर्दी

पद्मनाभ स्वामी महाराज यात्रा उत्सव दिमाखात साजरा; ११४ वर्षांची परंपरा, भाविकांची अलोट गर्दी
टेंभोडे:(प्रतिनिधी)
टेंभोडे येथील पद्मनाभ स्वामी महाराज यात्रा उत्सव यंदा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. मागील सात दिवसांपासून अखंड सप्ताह सुरू होता. या यात्रेसाठी मुंबई, पुणे, गुजरात ,कर्नाटक, महाराष्ट्र,सातारा, सांगली, गोवा तसेच संपूर्ण पालघर तालुक्यातील आगरी समाजासह पद्मनाभ स्वामी महाराजांचे असंख्य भक्त दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. पालघर परिसरातील जवळपास सर्व गावांतून भाविकांनी येथे हजेरी लावली.
या पवित्र स्थळी केलेले नवस पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पद्मनाभ स्वामी महाराजांनी समाजाला जवळ करून व्यसनमुक्तीचा संदेश देत गुरुपंथाची वाट दाखवली. याच ठिकाणी त्यांनी संजीवन समाधी घेतली असून, या वर्षी या समाधीला ११४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने यात्रा उत्सव विशेष दिमाखात साजरा करण्यात आला.
उत्सवाच्या मुख्य दिवशी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. हजारो भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
यंदाच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे नवीन तरुण मंडळींनी संपूर्ण कार्यभार यशस्वीपणे सांभाळला. यापूर्वी अनेक वर्षे सेवा देणाऱ्या ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आता ट्रस्टचे सर्व व्यवहार व उत्सवाची जबाबदारी तरुण पिढीकडे सोपवण्यात आली आहे. तरुण मंडळींनी येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम नियोजन, दर्शन व्यवस्था, स्वच्छता व शिस्त राखत कौतुकास्पद कामगिरी केली.
यात्रा यशस्वी होण्यासाठी गावातील सर्च मंडळींसह स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत सेवा दिली. मंदिर प्रशासनाच्या वतीने उपस्थित सर्व भाविकांचे, स्वयंसेवकांचे व सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
११४ वर्षांची अखंड परंपरा जपत, भक्ती, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारा पद्मनाभ स्वामी महाराज यात्रा उत्सव यंदाही यशस्वीपणे पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button