चिंचघर येथे ज्ञान रचना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.




चिंचघर येथे ज्ञान रचना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
चिंचघर (ता. विक्रमगड) येथील ज्ञान रचना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झेंडावंदन भिमराज बोकंद, लेखक तथा समाजसेवक यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अॅड. विवेक ठाकरे, सेक्रेटरी अनंता पाटील तसेच शाळेचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रमुख पाहुणे म्हणून जीएसटीचे कमिशनर चंद्रशेखर केदारे व जीएसटी कमिशनर सुहास पाटील साहेब यांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
या शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने यश मिळवत असून शाळेचा नावलौकिक वाढवत आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आदिवासी भागात असूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी ज्ञान रचना इंग्लिश मीडियम स्कूल ही आदर्श शाळा म्हणून ओळख निर्माण करत असून परिसरात तिचे विशेष कौतुक केले जात आहे.