Uncategorized

मुलुंड विभागात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

मुलुंड विभागात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मुंबई प्रतिनिधी : सतीश पाटील
आज 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलुंड विभागात विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मानवंदना देण्यात येऊन राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
मुलुंड पोलीस ठाणे (परिमंडळ 7), मुलुंड तहसीलदार कार्यालय, मॉडेला चेक नाका चौकी, डम्पिंग रोड परिसर, नाहूर विकास मंडळ, स्वराज क्रांती संघटना (मुलुंड डम्पिंग रोड), नाहूर शिवसेना शाखा क्रमांक 108 तसेच मेहुल सर्कल येथील बौद्ध विहार आदी ठिकाणी हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमांना मुलुंडमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. देशभक्तीपर घोषणा, राष्ट्रध्वजाला अभिवादन आणि एकतेचा संदेश देणाऱ्या उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर देशप्रेमाच्या वातावरणाने भारावून गेला होता.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
जय हिंद! वंदे मातरम्!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button