Uncategorized

आई एकविरा भक्त मंडळ, मुलुंडची 26 वर्षांची शिस्तबद्ध पालखी पदयात्रा उत्साहात संपन्न

आई एकविरा भक्त मंडळ, मुलुंडची 26 वर्षांची शिस्तबद्ध पालखी पदयात्रा उत्साहात संपन्न


मुंबई प्रतिनिधी : (सतिश पाटील)
मुंबईतील आई एकविरा भक्त मंडळ, मुलुंड यांची पारंपरिक पालखी पदयात्रा यंदाही मोठ्या भक्तिभावात आणि शिस्तीत पार पडली. गेल्या तब्बल 26 वर्षांपासून सुरू असलेली ही पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष श्री. कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे आयोजित करण्यात येत आहे.
मुलुंड परिसरातील गव्हाणपाडा, नवघर, नानेपाडा, नाहूरगाव, जुना मुलुंड तसेच आसपासच्या 60 पेक्षा अधिक गावांतील भाविकांनी या पालखीमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला. यंदा सुमारे 1200 पदयात्री सहभागी झाले होते. विशेष म्हणजे वय वर्ष 8 ते 80 पर्यंतचे महिला-पुरुष मोठ्या श्रद्धेने पालखी सोबत पायी चालत होते.
पालखीमध्ये शिस्त, एकोपा आणि भक्तीभाव यांचे सुंदर दर्शन घडले. संपूर्ण मार्गावर “आई माऊलीचा उदोउदो” असा गजर घुमत होता.
👉 महत्त्वाची सूचना :
महाप्रसाद भंडारा मंगळवार, दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी शिवगणेश मंदिर, नानेपाडा, मुलुंड (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या पालखी सोहळ्यात मुंबई पत्रकार सतिश पाटील यांना चौलआग्राव, गोवंडी तसेच मुलुंड पालखीला भक्तिभावाने खांदा देण्याचा मान मिळाला.
शेवटी “आई माऊलीचा उदोउदो” करत भाविकांनी भक्तीमय वातावरणात पालखी सोहळा पूर्ण केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button