Uncategorized

गणेश जयंतीनिमित्त पाटील परिवारात माघी गणरायाची भक्तिभावाने स्थापनानवयुवक भजनी मंडळ नाहूर गाव यांची सेवा, भाविकांची मोठी उपस्थिती

गणेश जयंतीनिमित्त पाटील परिवारात माघी गणरायाची भक्तिभावाने स्थापना
नवयुवक भजनी मंडळ नाहूर गाव यांची सेवा, भाविकांची मोठी उपस्थिती
मुंबई :
गणेश जयंती अर्थात माघी गणेश निमित्त मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार श्री. सतिश पाटील यांच्या पाटील परिवारात नवसाचा लाडका दीड दिवसांचा माघी गणराया अत्यंत भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहात स्थापन करण्यात आला.
या निमित्ताने सकाळ-संध्याकाळ आरती, धार्मिक विधी मोठ्या श्रद्धेने पार पडले. नवयुवक भजनी मंडळ, नाहूर गाव यांच्या वतीने भजन, आरती व सेवा अर्पण करण्यात आली. भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसर गणरायाच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
यावेळी प्रसाद भंडाऱ्याची उत्तम व्यवस्था पाटील परिवारातील महिलांनी नेहमीप्रमाणे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व चोखपणे पार पाडली. अनेक आप्तेष्ट, मित्रमंडळी व भाविकांनी मनोभावे दर्शन घेऊन गणरायाचा आशीर्वाद घेतला.
“गणराया सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो,” अशा प्रार्थनेसह उत्सवाची सांगता झाली.
“गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!” या जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button