कासा उपजिल्हा रुग्णालयात कुष्ठरोगग्रस्तांसाठी UDID व अपंग दाखला शिबिर ; १०९ रुग्णांची तपासणी, ५६ जणांना प्रमाणपत्र वितरण



कासा उपजिल्हा रुग्णालयात कुष्ठरोगग्रस्तांसाठी UDID व अपंग दाखला शिबिर ; १०९ रुग्णांची तपासणी, ५६ जणांना प्रमाणपत्र वितरण
डहाणू /प्रसाद भालेराव
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी (हुतात्मा दिन) चे औचित्य साधून दिनांक ३० जानेवारी रोजी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत “भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया.”हा संदेश देत उपजिल्हा रुग्णालय, कासा येथे कुष्ठरोगामुळे विकृती आलेल्या रुग्णांसाठी अपंग दाखला व UDID ( डिसॅबिलिटी आयडी) कार्ड शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
हे शिबिर आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन,
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, पालघर व
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, पालघर,
तसेच सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.
१०९ रुग्णांची तपासणी, ५६ पात्र रुग्णांना UDID प्रमाणपत्र
या शिबिरात एकूण १०९ कुष्ठरोगग्रस्त रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
त्यापैकी ५६ पात्र रुग्णांना अपंगत्व प्रमाणपत्र व UDID कार्ड वितरित करण्यात आले.
यामुळे या रुग्णांना विविध शासकीय योजना व सवलतींचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या उपक्रमास मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले — जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी,अस्थिरोग तज्ञ व विक्रमगड वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत राजगुरू,.डॉ. कृष्णकुमार यादव (MD मेडिसिन), डहाणू तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋग्वेद दुधाट, उपजिल्हा रुग्णालय कासा वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन वाघमारे तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
दुर्गम भागातील रुग्णांसाठी विशेष व्यवस्था
डॉ. ऋग्वेद दुधाट यांच्या विशेष नियोजनातून
सायवन, तवा, धुंदलवाडी, ऐना व गंजाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मदतीने
रुग्णांना ॲम्बुलन्सद्वारे रुग्णालयात आणणे व तपासणीनंतर सुरक्षित परत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.
यामुळे आदिवासी व दुर्गम भागातील रुग्णांना मोठा लाभ झाला.
सहाय्यक संचालक कार्यालय व अलर्ट इंडियाचे योगदान-
या शिबिराच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी
सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), पालघर कार्यालयातील अधिकारी व अवैद्यकीय अधिकारी अरुण कुमकर, फिजिओथेरपिस्ट सबा फारुकी, माया नाईक, चैतन्य कानप, प्रवीण जाधव, कल्पेश गायकवाड,विपुल कंटेला,ओमकार चव्हाण,विवेक सूर्यवंशी यांनी रुग्ण तपासणी व दस्तऐवज प्रक्रियेत मोलाचे सहकार्य लाभले
तसेच अलर्ट इंडिया संस्थेचे अधिकारी प्रकाश देवकर व विष्णू भुसारा, प्रदीप कोरडा, अलका कोरडा, सपना कामडी,ललिता हाडळ ह्या संपूर्ण टीमचे आणि
महिला स्वयंसेवक , प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स व आशा सेविका यांनी मोलाचे सहकार्य केले.
तर कार्यक्रमाच्या समन्वयासाठी डहाणू अवैद्यकीय पर्यवेक्षक प्रभाकर कांबळे व पालघर पर्यवेक्षक
राजेश पाटील यांनी सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
गांधीविचारांना सच्ची आदरांजली
महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी राबविण्यात आलेला हा उपक्रम
सेवा, समता व मानवतेच्या विचारांना सच्ची आदरांजली ठरला आहे. कुष्ठरोग निर्मूलन, सामाजिक सन्मान आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवेचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.