Uncategorized

समाजसेवक यजुवेंद्र सावे यांच्या कन्या कृति सावे हिचा राष्ट्रीय स्तरावर पराक्रमसुवर्ण व रौप्य पदकांची कमाई; बोईसर व पालघर जिल्ह्याचा गौरव वाढविला

समाजसेवक यजुवेंद्र सावे यांच्या कन्या कृति सावे हिचा राष्ट्रीय स्तरावर पराक्रम
सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई; बोईसर व पालघर जिल्ह्याचा गौरव वाढविला
–अलिबाग | प्रतिनिधी
आरसीएफ कॉलनी, थळ–अलिबाग येथे दिनांक २२ ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडलेल्या १५व्या व १६व्या नॅशनल फील्ड व इंडोअर आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील धनुर्विद्या संस्था ‘मैत्री आर्चर्स’च्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव उज्वल केले.
या राष्ट्रीय स्पर्धेत बोईसर येथील समाजसेवक श्री. यजुवेंद्र सावे यांची कन्या कृति यजुवेंद्र सावे हिने सीनियर गटात दमदार कामगिरी करत विशेष ओळख निर्माण केली.
कृति सावे हिने सीनियर फ्रीस्टाइल अनलिमिटेड कंपाउंड राऊंड प्रकारात सहभाग घेत १ सुवर्ण व १ रौप्य पदक पटकावले. तिच्या या यशामुळे केवळ कुटुंबाचाच नव्हे, तर बोईसर शहर व संपूर्ण पालघर जिल्ह्याचाही गौरव वाढला आहे. कृतिची ही कामगिरी परिसरातील मुली व युवा खेळाडूंकरिता प्रेरणादायी ठरत आहे.
कृति सावे हिच्या यशासोबतच मैत्री आर्चर्सच्या इतर खेळाडूंनीही विविध वयोगटांत उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पदके जिंकून संस्थेचा नावलौकिक वाढविला.
इतर पदकविजेते खेळाडू पुढीलप्रमाणे —
मेधांश संदीप वासुदेव – अंडर-10 व अंडर-14 बॉयज फ्रीस्टाइल रिकर्व
(२ सुवर्ण, १ कांस्य)
झील दीपक श्रेता – अंडर-19 व अंडर-14 फ्रीस्टाइल रिकर्व
(२ सुवर्ण, १ कांस्य)
खुशांत साईनाथ पाटील – अंडर-14 फ्रीस्टाइल अनलिमिटेड कंपाउंड
(२ सुवर्ण)
समर्थ राजेश साठघरे – अंडर-17 (१ रौप्य),
सीनियर मेन फ्रीस्टाइल रिकर्व (१ रौप्य, १ कांस्य)
चार्वी योगेश चावक – सीनियर (२ रौप्य),
अंडर-17 मुली (१ कांस्य)
किमाया मंदर वैद्य – अंडर-17 फ्रीस्टाइल अनलिमिटेड कंपाउंड
(१ कांस्य)
मानस्वी मोर्डे – अंडर-17 (१ सुवर्ण, १ कांस्य),
तसेच ९ स्पॉट इव्हेंटमध्ये द्वितीय क्रमांक
जानसी दिलेश पाटील – अंडर-19 व सीनियर फ्रीस्टाइल रिकर्व
(३ सुवर्ण)
पूर्वा सिद्धार्थ बाविस्कर – सीनियर फ्रीस्टाइल अनलिमिटेड कंपाउंड
(२ रौप्य)
ध्रुव जयंत सातघरे व यशवर्धन राजेश राऊत –
सीनियर मेन फ्रीस्टाइल रिकर्व (प्रत्येकी २ रौप्य)
जयंत राजाराम सातघरे – वेटरन फ्रीस्टाइल अनलिमिटेड कंपाउंड
(१ सुवर्ण)
या दैदीप्यमान यशाबद्दल मैत्री आर्चर्सचे प्रशिक्षक श्री. जयंत सातघरे, संस्थेचे पदाधिकारी, पालक व क्रीडाप्रेमींनी सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button