Uncategorized

धोधडपाडयात ज्ञानमातेचे नूतन विद्यामंदिर ज्ञानदानासाठी सज्ज

धोधडपाडयात ज्ञानमातेचे नूतन विद्यामंदिर ज्ञानदानासाठी सज्ज
तलासरी दि. ४(डॉ. दत्तात्रय शिंदे)

तालुक्यातील उपलाट येथील ख्रिस्तराय आदिवासी विद्यामंदिर शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दि. ३ रोजी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.सदर प्रसंगी उद्घाटक मा . फादर अनिल परेरा (प्रोव्हिन्सल, मुंबई प्रांत), गार्डवेल इंडस्ट्रीजचे मालक तथा दानशूर दांपत्य मा.विल्यम तुस्कानो, सौ.जॉना तुस्कानो,तसेच संस्था संचालक फा.निलम लोपीस, शाळा संचालक फादर सॅबि कोरिया,वॉल्टर लोबो , सौ.कॅरल लोबो,माजी जिल्हापरिषद सदस्य श्री. अनिल झिरवा, सरपंच प्रविण बाभनीया, श्री. पास्कल हरपाले सर, दामू बरफ सर,फादर ज्यो, फादर जॉन फरोज, धर्मगुरु, सिस्टर्स, आजी माजी मुख्याध्यापक, ग्रामस्थ, शिक्षक, युवक मंडळ, शाळेचे आजी माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
पारंपरिक नृत्य आणि ढोल-काहलीच्या गजरात मान्यवरांचे आगमन झाले.धर्मगुरुंनी इमारतीच्या आशीर्वादाची प्रार्थना करत व फित कापून नाम फलकाचे अनावरण करूत नूतन इमारतीचे उदघाटन झाले . यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी तुस्कानो फॅमिलीच्या हस्ते सभागृहाचे अदघाटन झाले. शालेय विद्यार्थ्यांनी शतक महोत्सवावर आधारित नृत्य सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
उदघाटक फा. अनिल परेरा यांनी उच्च ध्येय ठेवा, उच्च शिक्षित होऊन समाजाचा, गावाचा आणि पर्यायाने देशाचा विकास करा असा मोलाचा संदेश दिला. प्रमुख पाहुण्या सौ. जॉना तुस्कानो यांनी हायस्कूल आणि पुढे कॉलेज सुरु व्हावे अशी मनोकामना व्यक्त केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अनिल झिरवा यांनी शाळेच्या विकासासाठी सदैव मदत करण्याची तयारी दर्शविली.मा. संस्था संचालक आणि शाळा संचालक यांनी देखील मार्गदर्शनपर संदेश दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. मनोज भुरकूड सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी तर आभार आरिफा शेख मॅडमने आभार यांनी पार पाडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तसेच ग्रामस्थानी मोलाचे सहकार्य केले. दीर्घकाळ स्मरणात राहील असा हा अभूतपूर्व सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button