Uncategorized

वांजोळे गावातील कन्या कु.अश्विनी मोरे झाली मुंबई कारागृह पोलीस कॉन्स्टेबल…

वांजोळे गावातील कन्या कु.अश्विनी मोरे झाली मुंबई कारागृह पोलीस कॉन्स्टेबल…


  • प्रतिनिधी / विशाल दांडगे

भुसावळ : (२४ डिसेंबर २०२५)

भुसावळ : तालुक्यातील वांजोळे या छोट्याशा गावातील तरुणीने जिद्द, मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर अनेक संकटांना मात करीत ती मुंबई कारागृह पोलीस कॉन्स्टेबल झाली आणि या यशामुळे तिचे कुटुंबात जणू वसंत ऋतू आल्याची अनुभूती आली.

अश्विनी सुनील मोरे असे या पोलीस कॉन्स्टेबल झालेल्या तरुणीचे नाव असून तिच्या यशाची कहाणी ही तितकीच संघर्षमय आहे.अश्विनीचे वडील हे ट्रॅक्टर ड्रायवर असून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित. अश्विनी ही माध्यमिक शिक्षण घेत असताना तिच्या वडीलांचे मोठे ऑपरेशन झाले. वडिलांच्या ऑपरेशन नंतर जड, मेहनतीचे व मजुरीचे कामे शक्य होत नसल्याने नक्कीच परिवाराची धुरा तिची आई रंजनाबाई हिचे खांद्यावर आली. आई-वडिलांनी मजुरी करून लेकीस शिकविले. अश्विनीने सुद्धा आपल्या आई-वडिलांची कष्टाची जाणीव ठेवत पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी ठेवत पोलीस भरतीचा सराव चालू ठेवला. सुरुवातीला दोन वेळा तिला तिचे ध्येय गाठता आले नाही. थोड्याफार गुणांनी तिला तिच्या ध्येयापासून दूर ठेवले पण अपयशाने खचून न जाता अश्विनीने निराश न होता मुंबई कारागृह पोलीस कॉन्स्टेबल या पदाला तिच्या तिसऱ्या प्रयत्नात गवसणी घातली. या तिच्या यशासह ती वांजोळे गावातील पहिली महिला पोलीस ठरली आहे.
अश्विनीच्या यशासाठी तिला तिचे प्रशिक्षक जयंत अशोक चौधरी व प्रशिक्षक दिग्विजय दिलीप दाभाडे जळगाव पोलीस यांची मोलाची साथ लाभली.
समाजातील विविध स्तरातून अश्विनीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. तिचे अभ्यासिकेतील व सरावातील सहकारी यांनी अश्विनीची गावात डीजेच्या तालात वाजत गाजत मिरवणूक काढली. ग्रामपंचायत वांजोळे व गावकऱ्यांच्या वतीने देखील अश्विनीचा सत्कार करण्यात आला. दिनांक 24 डिसेंबर रोजी अश्विनी ही तिचे मामा ॲड. संतोष कोळी यांच्याकडे मुक्ताईनगर येथे आली असता मुक्ताईनगर मध्ये सुद्धा तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
आजच्या तरुणांनी देखील अश्विनी कडून प्रेरणा घेऊन जिद्दीने लढण शिकावे यासाठी ती एक मूर्तिमंत उदाहरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button