Uncategorized

पालघरमध्ये तीन दिवसीय अंतरिक्ष विज्ञान महोत्सवाची भव्य सुरुवात.

पालघरमध्ये तीन दिवसीय अंतरिक्ष विज्ञान महोत्सवाची भव्य सुरुवात.

पालघर (प्रतिनिधी): सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट, पालघर यांच्या वतीने १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान विक्रम साराभाई स्पेस प्रदर्शनी आणि “स्पेस ऑन व्हील्स” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठ संलग्न तसेच अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (AICTE) मान्यताप्राप्त असलेली ही स्वायत्त संस्था आपल्या वेवूर, मनोर रोड येथील कॅम्पसमध्ये हा अनोखा शैक्षणिक महोत्सव आयोजित करत आहे.ही प्रदर्शनी भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (ISRO) च्या स्पेस एप्लिकेशन सेंटर,अहमदाबाद यांच्या सहकार्याने होत असून विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये अंतरिक्ष विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल उत्सुकता व जागरूकता वाढवणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण “स्पेस ऑन व्हील्स” ही मोबाइल अंतरिक्ष प्रदर्शनी युनिट असून त्यामध्ये भारतातील अंतरिक्ष मोहिम,उपग्रह तंत्रज्ञान आणि प्रक्षेपण या बाबतची माहिती आकर्षक मॉडेल्स,माहिती फलक व ऑडिओ- व्हिज्युअल माध्यमातून सादर केली जात आहे. त्यामुळे अभ्यागतांना ज्ञानवर्धक आणि प्रत्यक्ष अनुभवात्मक शिक्षणाची संधी मिळणार आहे. प्रदर्शनीत अंतरिक्ष मोहिम,उपग्रह प्रणाली आणि रॉकेट तंत्रज्ञानाशी संबंधित इंटरॅक्टिव्ह मॉडेल्स व शैक्षणिक सादरीकरणे मांडण्यात आली असून भारताच्या अंतरिक्ष क्षेत्रातील कामगिरीचे सोप्या व रंजक पद्धतीने दर्शन घडवले जाणार आहे.
हा उपक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून तीन दिवसांत पालघर जिल्ह्यासह वाडा, मनोर, मुंबई, नाशिक व परिसरातून सुमारे १०,००० पेक्षा अधिक नागरिक भेट देतील असा अंदाज आहे. १७ फेब्रुवारीला सुमारे ३,८०० लोक, १८ फेब्रुवारीला ४,१०० तर १९ फेब्रुवारीला अंदाजे २,५०० अभ्यागत उपस्थित राहतील,अशी आयोजकांची माहिती आहे.
विविध शाळा-महाविद्यालयांना विशेष निमंत्रणे पाठवण्यात आली असून दिव्यांग व दृष्टिबाधित विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. आयोजकांच्या मते अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करून विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात कैरिअर करण्यासाठी प्रेरणा देतात. हा महोत्सव पालघर परिसरातील एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक कार्यक्रम ठरेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
१६ फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. एस.पी.व्यास,अल्बर्ट डिसोजा, रोमेरो डिसोजा, मेलरॉय क्रेस्टा, डॉ. कमल शाह, एल्वीना डिसोजा, डॉ. सविता टॉरो, अशोक मेटी आणि हीरालाल पटेल आदी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button