Uncategorized

केळवे ते धाकटी डहाणू ५५ किमी रस्त्याचे भूमिपूजन; १६५.६९ कोटींच्या विकासकामांना प्रारंभ

केळवे ते धाकटी डहाणू ५५ किमी रस्त्याचे भूमिपूजन; १६५.६९ कोटींच्या विकासकामांना प्रारंभ
पालघर :(प्रतिनिधी) पालघर विधानसभा मतदारसंघातील माकुणसार–केळवे ते धाकटी डहाणू पारनाकापर्यंतच्या ५५ किलोमीटर लांबीच्या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते पार पडले. हा कार्यक्रम माहीम पानेरी येथे संपन्न झाला.
या वेळी माहीमच्या सरपंच प्रीती पाटील, उपसरपंच नरुत्तम राऊत, माहीम ग्रामपंचायत सदस्य, सागर पाटील, नीलम राऊत, शंकर नारले, विकास मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्वे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघरचे उपअभियंता पोपटराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर झाई–बोर्डी–तारापूर–परनाळी–माहीम–केळवे ते वरई राज्य मार्ग क्र. ८ या रस्त्याच्या सुधारणा व मजबुतीकरणासाठी १८४ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. त्यापैकी १६५.६९ कोटी रुपयांची स्वीकृत निविदा मंजूर झाली आहे. या प्रकल्पांतर्गत नवीन रस्ता बांधकाम, रस्ता नूतनीकरण, काँक्रीट रस्ता, मोऱ्या, लहान व मोठे पूल, चौकांची सुधारणा, आर.सी.सी. गटार, १५ बसथांबे, तसेच रोड फर्निचर आदी कामांचा समावेश आहे.
या रस्त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांचे प्रमाण घटेल तसेच नागरिकांना सुरक्षित व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालघर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास आमदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला.
कोट :
२०२३ मध्ये पालघर–मनोर–विक्रमगड–जव्हार–मोखाडा–त्रिंबकेश्वर असा पालघर व नाशिक जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यास मंजुरी मिळाली आहे. शहरातील मोठ्या रहदारीच्या ठिकाणी बायपास करण्याबरोबरच डोंगरघाट भागात शक्य असल्यास बोगदा (टनल) करण्याबाबतही त्यावेळी सूचना करण्यात आल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button